ITR भरण्यासाठी उरले फक्त 27 दिवस; जाणून घ्या फॉर्ममध्ये झालेले ‘हे’ बदल…

ITR भरण्यासाठी उरले फक्त 27 दिवस; जाणून घ्या फॉर्ममध्ये झालेले ‘हे’ बदल…

ITR filing form : आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर रिटर्न फायलिंग भरण्यसाठी आता केवळ 27 दिवस उरले आहेत. 31 जुलै 2023 ही यासाठी अंतिम मुदत असणार आहे. मात्र यावर्षी आयकर रिटर्न फायलिंग फॉर्ममध्ये काही बदल झाले आहेत. त्यामुळे फॉर्म भरताना करदात्यांनी ते जाणून घेणे गरजेचे आहे. काय आहेत हे बदल जाणून घेऊ… ( Changes in ITR filing form only 27 days for due date too )

NCP Crisis : ‘पवार साहेबांना त्रास होतोय’; भेटायला आलेल्या आव्हाडांचे डोळे पाणावले

व्हर्च्युअल मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागणार :

1 एप्रिल 2022 पासून व्हर्च्युअल मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारण्यासाठी तपशील सादर केले गेले आहेत. त्यामुळे क्रिप्टो करन्सी सारख्या व्हर्च्युअल मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर टीडीएस आकारला जाणार आहे. त्यामुळे व्हर्च्युअल मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नाची सविस्तर म्हणजे विक्रिची रक्कम, तारिख अशी माहिती देण्यासाठी आयकर रिटर्न फायलिंग फॉर्ममध्ये बदल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयासमोरच दोन्ही पवारांचे समर्थक भिडले…

कर कपातीचा दाव्यासाठी डोनेशन रेफरन्स नंबर द्यावा लागणार :

कर भरताना करदात्यांकडून देणगीवरील कर कपातीसाठी दावा केला जातो. तो कलम 80G अंतर्गत येतो. त्यामध्ये देणगी ही कर कपातीस पात्र ठरल्यास 50 टक्के कपातीची परवानगी मिळते. मात्र त्यासाठी आयकर रिटर्न फायलिंग फॉर्ममध्ये डोनेशन रेफरन्स नंबर देणे बंधनकारक असणार आहे. हा क्रमांक करदात्यांनी दिलेल्या देणगीच्या पावतीवर असतो.

रिलिफचा दावा केलेल्या उत्पन्नाचा खुलासा द्यावा लागणार :

भारतीय करदात्यांना परदेशी सेवानिवृत्ती लाभातून मिळणाऱ्या उत्पन्नावरील कर पुढे ढकलण्याचा पर्याय आहे. मात्र ही सवलत मिळवण्यासाठी त्या उत्पन्नाचा खुलासा आयकर रिटर्न फायलिंग फॉर्ममध्ये करणे आवश्यक असणार.

विदेशी गुंतवणुकीची माहिती द्यावी लागणार :

आयकर रिटर्न फायलिंग फॉर्ममध्ये काही बदल झाले आहेत. त्यामध्ये सेबीचा नोंदणी क्रमांक देणे आवश्यक असणार आहे. त्यामध्ये करदात्यांनी त्यांच्या विदेशी पोर्टफोलिओची माहिती द्यायची आहे.

इंट्राडे ट्रेडिंगवर खुलासा द्यावा लागणार

नवीन ITR फॉर्मनुसार, उलाढाल आणि इंट्राडे ट्रेडिंगमधून मिळणारे उत्पन्न नव्याने सादर केलेल्या ‘ट्रेडिंग अकाउंट’ अंतर्गत नोंदवले जाणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube