मच्छिमार सहकारी संस्थांना भागभांडवल योजना

मच्छिमार सहकारी संस्थांना भागभांडवल योजना

LetsUpp | Govt.Schemes
मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना (Fishery Cooperative Societies)विक्री, वितरण व पुरवठा (Distribution and Supply)व्यवस्थेसाठी (फ्राय बोटुकली, खते, खाद्य आदीसमवेत) भागभांडवल अर्थसहाय्य (Equity financing)देऊन सहकारी संस्था बळकट करणे (Strengthening of cooperatives)व सहकारी संस्थेच्या सभासदांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेच्या प्रमुख अटी :
▪ नोंदणीकृत मच्छिमार सहकारी संस्था असली पाहिजे.
▪ संस्थेचे मागील तीन वर्षाचे आर्थिक पत्रके असली पाहिजे.
▪ संस्थेचे मागील तीन वर्षाचे लेखापरिक्षण झालेले पाहिजे. त्या संस्थेस किमान ब वर्ग प्राप्त पाहिजे.

आवश्यक कागदपत्र : संभाव्य खरेदीचे कोटेशन

लाभाचे स्वरूप असे : सागरी क्षेत्रातील मच्छिमार सहकारी संस्थांना ओली व सुकी मासळी खरेदी विक्री व मासेमारी साधने खरेदी विक्री व्यवहारासाठी भागभांडवल दिले जाते. तसेच भूजल क्षेत्रातील संस्थांना तलाव ठेका रक्कम, मत्स्यबीज, कोळंबीबीज, खते, प्रथिने आदी खरेदीसाठी तसेच वाहतूक व्यवस्था, संचयन, हार्वेस्टींग, विक्री व्यवस्थासाठी मजूरी इत्यादीसाठी भागभांडवल अर्थसहाय्य दिले जाते.

या ठिकाणी संपर्क साधावा : जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube