चर्मकार समाजातील नागरिकांसाठी गटई स्टॉल योजना

चर्मकार समाजातील नागरिकांसाठी गटई स्टॉल योजना

LetsUpp l Govt.Schemes

अनूसुचित जातीतील (Scheduled castes) चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, मोची आदी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक(Educational), आर्थिक व सामाजिक विकास (Economic and Social Development) होण्यासाठी महामंडळामार्फत (corporations)योजना राबविण्यात येतात.

Video Viral : नीतू कपूरचा ‘नाटू नाटू’ गाण्यावर भन्नाट डान्स; व्हिडिओ व्हायरल…

योजनेसाठी प्रमुख अटी :
– अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
– अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
– अर्जदाराचे वय १० ते ५० वर्षांपर्यत असावे.
– अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
(अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.98000/ व शहरी भागासाठी रु.१,२०,००० / पर्यंत असावे.
(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१,००००० / पर्यंत असावे.

लाभाचे स्वरूप : या योजनेंतर्गत गटई कामगारांना १०० टक्के अनुदान तत्वावर पत्र्याचे स्टॉल्स व ५०० रुपये इतके रोख अनुदान देण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे :
– जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला असावा.
– रहिवासी दाखला
– अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.

संपर्काचे ठिकाण : सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाजकल्याण कार्यालय

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube