रोख रक्कमच नाही, तर आता एटीएममध्ये मिळणार नवीन डेबिट, क्रेडिट कार्ड
RuPay Debit Card : आता एटीएममध्ये रोख रक्कमच नाही तर डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड देखील मिळणार आहे. बँकिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी
RuPay Debit Card : आता एटीएममध्ये रोख रक्कमच नाही तर डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड देखील मिळणार आहे. बँकिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मुंबईत आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026’ (Global Fintech Fest 2026) मध्ये, ‘डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस’ने (DFS) तीन मोठ्या डिजिटल उपक्रमांची घोषणा केली आहे. यामध्ये नवीन ओपन-सोर्स, अँड्रॉइड-आधारित एटीएम सिस्टमचाही समावेश आहे.
एटीएममध्ये मिळणार 3 प्रकारची कार्डे
आपल्या देशात प्रामुख्याने एटीएमचा वापर रोख रक्कम काढण्यासाठी, पैसे जमा करण्यासाठी आणि पिन बदलण्यासाठी करण्यात येतो मात्र आता नवीन तंत्रज्ञानावर आधारित मशीन्समुळे रुपे (RuPay) डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) देखील एटीएममध्ये मिळणार आहे. मशीनमधून कार्ड बाहेर आले की, त्याचा वापर त्वरित रोख रक्कम काढण्यासाठी किंवा खरेदीसाठी करू शकता.
नवीन एटीएम सिस्टिमची चाचणी सुरू
सध्या या नवीन एटीएम सिस्टिमची चाचणी (Trials) सुरू आहे. या प्रक्रियेत नऊ प्रमुख बँका, ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (NPCI) आणि एटीएम उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे. खालील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका सध्या याची चाचणी करत आहेत:
स्टेट बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ बडोदा
पंजाब नॅशनल बँक
बँक ऑफ इंडिया
यूको बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडिया
स्लिक स्मॉल फायनान्स बँक
एअरटेल पेमेंट्स बँक
एटीएममध्ये येणाऱ्या नवीन सुविधा तर दुसरीकडे येणाऱ्या काही दिवसात एटीएम केवळ रोख रक्कम देणारी यंत्रे म्हणून नाही, तर ‘मिनी-बँक शाखा’ म्हणून काम करतील. या मशीन्समध्ये चेक जमा करणे, नवीन बँक खाते उघडणे आणि त्वरित कर्जासाठी अर्ज करणे यांसारख्या सेवांचा समावेश करण्यात येणार आहे.