Health Tips : चालताना ‘या’ चुका करू नका? होईल वाईट परिणाम

  • Written By: Published:
Health Tips : चालताना ‘या’ चुका करू नका? होईल वाईट परिणाम

मुंबई : व्यायामाचा सोपा मार्ग म्हणजे चालणे होय. परंतु तुम्ही चालताना कसे चालता, चालताना चुका करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते
जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी चालत असाल तर जाणून घ्या की चालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? वॉक करताना तुम्ही कोणती चूक करता आणि त्यामध्ये कोणत्या सुधारणा करता येतील.

चालण्याचा वेग एवढा असावा?
जर तुम्ही दररोज 20 ते 30 मिनिटे चालत असाल तर तुमचा वेग ताशी 5.8 किमी असावा. तुमचे शरीर आणि वजनानुसार तुम्ही सामान्य गतीने चालू शकता, पण वजन कमी करण्यासाठी चालत असाल तर जलद चालण्याची सवय लावा.

https://youtu.be/IoWA0j4sWF0

चालताना मूठ बंद करु नका
चालताना अनेकदा लोक नकळत हाताची मूठ घट्ट बंद करतात. चालताना बंद केल्याने त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. मूठ घट्ट बंद करुन चालल्याने शरीरावर दबाव निर्माण होतो आणि याचा हात, खांदे आणि मानेवर परिणाम होतो. त्यामुळे रक्तदाबावरही परिणाम होऊ शकतो. बोटांमध्ये सूज आणि वेदना जाणवू शकतात. म्हणूनच चालताना मूठ दाबू नका.

निरोगी राहण्यासाठी शरीराची हालचाल होणे गरजेच आहे. चालणे हा व्यायामाचा सोपा मार्ग आहे. तुम्ही दररोज तर व्यायाम न करता फक्त चालण्याची सवय लावली तरी, तुम्हाला खूप फायदा होईल. एका संशोधनानुसार, एखाद्या व्यक्तीने दररोज 20 ते 30 मिनिटे चालणे आवश्यक आहे. काही पावले चालणे आरोग्यासाठी फायदेशीर असून यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube