Jabalpur Cruise Accident : ‘लाईफ’ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जॅकेटचा इतिहास काय?

Jabalpur Accident जोरदार वादळमुळे बर्गी धरणाजवळ 31 प्रवाशांना घेऊन जाणारे क्रूझ जहाज बुडाले. यात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर...

  • Written By: Published:
Jabalpur Cruise Accident : 'लाईफ' जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जॅकेटचा इतिहास काय?

Jabalpur Cruise Accident & Life Jacket History : जबलपूरमधील नर्मदा नदीच्या पात्रात गुरुवारी (दि. ३०) निसर्गाच्या कोपाने एक भीषण तांडव घडले. जोरदार वादळ आणि चक्रीवादळामुळे बर्गी धरणाजवळ 31 प्रवाशांना घेऊन जाणारे क्रूझ जहाज बुडाले. या अपघातात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर, अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. मात्र, या दुर्घटनेने एका गंभीर विषयाला पुन्हा वाचा फोडली आहे, ती म्हणजे जलप्रवासात जीवनरक्षक मानले जाणाऱ्या ‘लाईफ जॅकेट’ चा इतिहास काय? लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? याबद्दल जाणून घेऊया…

मृत्युला चकवा अन् चाळीशी विसरा; रशियात तयार होतंय मनुष्याला 150 वर्षे जगवणारे औषध!

लाईफ जॅकेटचा 170 वर्षांचा गौरवशाली इतिहास

पाण्यावर सुरक्षिततेसाठी वापरल्या जाणाऱ्या लाईफ जॅकेटचा प्रवास 1850 च्या दशकात सुरू झाला. त्याकाळी लाकडी जहाजांची जागा लोखंडी जहाजांनी घेतली होती, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला होता. कॅप्टन जॉन रॉस वॉर्ड यांनी पहिले ओळखण्यायोग्य लाईफ जॅकेट शोधून काढले. सुरुवातीच्या काळात हे जॅकेट ‘कॉर्क’ म्हणजे झाडाचे हलके साल वापरून बनवले जात असे. कॉर्कचे तुकडे कापडात शिवून ही वेस्ट तयार केली जात होती. त्याकाळी हे जॅकेट घालण्यास थोडे कठीण होते, तरीही पाण्यावर तरंगण्यासाठी हा एक क्रांतिकारी शोध ठरले होते. यामुळे कठीण परिस्थितीत बुडण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी झाला. हळूहळू लोकांनी या जॅकेट्सचा वापर सुरू केला आणि जहाजांवर ते अनिवार्य सुरक्षा उपकरण म्हणून ठेवले जाऊ लागले.

1900 च्या सुरुवातीला यामध्ये मोठा बदल झाला. कॉर्कच्या जागी ‘कापोक’ नावाच्या नैसर्गिक तंतूचा वापर सुरू झाला, जो कापसासारखा मऊ आणि अधिक जलरोधक होता. कालांतराने तंत्रज्ञान प्रगत होत गेले आणि आजची आधुनिक, वजनाला हलकी आणि मजबूत लाईफ जॅकेट्स अस्तित्वात आली.

UPI : आता बँक खात्याशिवाय चालणार UPI; कसं सेट करायचं? कुणाकडे असणार पेमेंट अप्रुव्हल

जॅकेट असून माय-लेकाचा मृत्यू का झाला?

हा झाला लाईफ जॅकेटचा इतिहास पण, जबलपूर अपघातातील एका हृदयद्रावक छायाचित्राने सर्वांनाच सुन्न केले आहे. अंगात लाईफ जॅकेट असूनही एका आई आणि तिच्या चिमुरड्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. या फोटोमुळे एक मोठा तांत्रिक प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे लाईफ जॅकेट असूनही या माय लेकांचा मृत्यू कसा झाला. तर, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ज्यावेळी क्रूझचा अपघात झाला, त्यावेळी बोटीवरील प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातले नव्हते. जेव्हा बोट बुडू लागली, तेव्हा घाईघाईने लाईफ जॅकेटचे वाटप सुरू झाले. त्यावेळी क्रूझवरील या आईने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःच्याच लाईफ जॅकेटच्या आत घेतले. तज्ज्ञांच्या मते, हीच चूक जीवघेणी ठरली. Jabalpur Cruise Accident & Life Jacket History

कारण, लाईफ जॅकेट हे एका विशिष्ट व्यक्तीच्या वजनानुसार आणि शरीराच्या संरचनेनुसार डिझाइन केलेले असते. जेव्हा आईने मुलाला आपल्या जॅकेटमध्ये सामावून घेतले, तेव्हा त्या जॅकेटची ‘बायोन्सी’ म्हणजे तरंगण्याची क्षमता आणि संतुलन पूर्णपणे बिघडले. एका व्यक्तीसाठी बनवलेले जॅकेट दोघांचे वजन पेलू शकले नाही आणि त्या दोघांचेही डोके पाण्यावर राहण्याऐवजी ते पाण्यात बुडाले.

बँक ग्राहकांसाठी ‘अच्छे दिन’! आता मोबाईल नंबरप्रमाणे बँक खाते करता येणार पोर्ट…

लाईफ जॅकेट नेहमीच जीव वाचवते असे नाही

लाईफ जॅकेट परिधान केलेले असेल तरीही तुमचा जीव वाचेलच असे नाही याला खालील मुद्दे कारणीभूत ठरू शकतात.

1. चुकीचे फिटिंग: जर जॅकेटचे पट्टे सैल असतील, तर पाण्यात पडताच जॅकेट शरीरावरून निसटून वर येते आणि व्यक्ती खाली बुडू शकतो.

2 कालबाह्य उपकरणे: जॅकेट खूप जुने असल्यास त्यातील फोमची हवा धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. खराब झालेले कापड पाणी शोषून जॅकेटला जड बनवू शकते.

3 अति लाटा आणि वेगवान प्रवाह: निसर्गाचा प्रकोप मोठा असेल, तर केवळ जॅकेटच्या जोरावर तग धरणे कठीण असते.

4 बेशुद्धावस्था: जर जॅकेट योग्य दर्जाचे नसेल आणि व्यक्ती बेशुद्ध पडली, तर तिचे तोंड पाण्याबाहेर ठेवण्यास जॅकेट अपयशी ठरू शकते.

जबलपूरची ही दुर्घटना केवळ एक अपघात नसून, सुरक्षा उपकरणांच्या योग्य वापराबाबतचा एक मोठा धडा आहे. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले आणि लाईफ जॅकेटसारखी साधने उपलब्ध असली, तरी मानवी प्रसंगावधान आणि योग्य माहितीला कोणताही पर्याय नाही. त्यामुळे, यापुढे जेव्हा कधी तुम्ही जलपर्यटनाचा आनंद घ्याल, तेव्हा केवळ जॅकेट अंगावर चढवून शांत बसू नका. ते तुमच्या शरीराला योग्यरित्या फिट आहे का, त्याचे पट्टे घट्ट बांधले आहेत का आणि ते सुस्थितीत आहे का, याची खात्री करा. प्रशासनानेही क्रूझवर प्रशिक्षित रक्षक आणि दर्जेदार उपकरणांची सक्ती करणे काळाची गरज असून, जलप्रवास आनंददायी असावा, जीवघेणा नसावे, हीच या अपघाताने दिलेली धोक्याची घंटा आहे.

follow us