खुशखबर! नाबार्डमध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती सुरू, 15 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज….

खुशखबर! नाबार्डमध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती सुरू, 15 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज….

NABARD Recruitment 2024: आज अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job)शोधात आहेत. तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे, नुकतीचे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंकेने म्हणजेच, नाबार्डने (NABARD) भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत, सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) (ग्रेड ए) पदाच्या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार नाबार्डच्या अधिकृत वेबसाइट nabard.org वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. दरम्यान, पदांची संख्या, या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय? अर्ज कसा करावा? अर्ज शुल्क किती? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? याच विषयी जाणून घेऊ.

Manasi Naik :मानसी नाईकचा सिम्पल लूक अन् किलर स्माईल 

रिक्त पदे आणि पदांची संख्या
या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील सहाय्यक व्यवस्थापक (असिस्टंट मॅनेजर) पदांसाठी 102 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
1. सहाय्यक व्यवस्थापक : 100 पदे.
2. एम (राज्यसभा): 2 जागा.

या पदभरतीसाठी अर्ज करायला आता अवघेच काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उमेदवारांनी वेळ न दवडता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. 27 जुलै 2024 पासून भरती प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 15 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतील.
उमेदवारांची पहिल्या टप्प्यातील प्राथमिक परीक्षा 1 सप्टेंबर 2024 रोजी घेतली जाईल.

शैक्षणिक पात्रता-
ज्या उमेदवारांना या पद भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी अधिसूचनेतील पदनिहाय शैक्षणिक पात्रता तपासावी.

अधिसूचना लिंक- https://www.nabard.org/auth/writereaddata/CareerNotices/2707240233final-advertisement-grade-a-rdbs-rajbhasha-2024.pdf

Khel Khel Mein: ‘मित्रांच्या फोनमध्ये लपलेले रहस्य उघड होणार, अक्षयच्या ‘खेल खेल में’चा ट्रेलर रिलीज 

वयोमर्यादा –
नाबार्डच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जुलै 2024 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.

अर्ज फी
SC/ST/PWD उमेदवारांसाठी अर्जाची फी 150 रुपये आहे आणि इतर सर्वांसाठी 700 रुपये प्लस 150 रुपये म्हणजे, 850 रुपये आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे.

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2024

महत्वाचं असं की, अर्ज भरतांना भरतांनी आधी अधिसुचना वाचावी. त्यानंतरच अर्ज करावा. कारण, अर्जात काही त्रुटी राहिल्यास किंवा उमेदवारांनी अपुरी माहिती अर्जात भरल्यास अर्ज नाकारल्या जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

नाबार्डची अधिकृत वेबसाइट: nabard.org

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेत चार टप्पे असतील. प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, सायकोमेट्रिक चाचणी आणि मुलाखत. प्राथमिक परीक्षेत 200 प्रश्नांना 200 गुण असतील. परीक्षेचा कालावधी 120 मिनिटांचा असेल. मुख्य परीक्षा 200 गुणांची असेल आणि कालावधी 210 मिनिटे असेल. सायकोमेट्रिक चाचणी MCQ आधारित असेल आणि कालावधी 90 मिनिटांचा असेल आणि शेवटी मुलाखत 50 गुणांची असेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या