शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 719 अंकांनी घसरला; नेमकं कारण काय?

Share Market Crash Today Reason : आठवड्यातील पहिल्या दिवशी सोमवारी (8 जून) भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने अनेक गुंतवणूकदांना

Share Market Crash Today Reason

Share Market Crash Today Reason : आठवड्यातील पहिल्या दिवशी सोमवारी (8 जून) भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने अनेक गुंतवणूकदांना नुकसान सहन करावे लागले आहे. आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाल्यानंतर शेअर बाजार बंद देखील घसरणीने झाले आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 मध्ये आज एक टक्क्यांची घसरण दिसून आली. आज 30 शेअर्सचा समावेश असलेला सेन्सेक्स 719.08 अंकांच्या (0.97 टक्के) घसरणीसह 73,524.26 वर तर निफ्टी 243.70 अंकांच्या (1.04 टक्के) घसरणीसह 23,123 वर बंद झाला.तर दुसरीकडे निफ्टी मिडकॅप (Nifty Midcap) निर्देशांक 1.40 टक्क्यांनी आणि निफ्टी स्मॉलकॅप (Nifty Smallcap) निर्देशांक 1.92 टक्क्यांनी घसरला.

रिअल इस्टेट क्षेत्रात सर्वाधिक घसरणआज भारतीय शेअर बाजारात निफ्टी रिअल्टी (2.56 टक्के), निफ्टी मेटल (2.33 टक्के) आणि निफ्टी ऑटो (1.85 टक्के) मध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. तसेच निफ्टी मीडिया, निफ्टी ऑइल अँड गॅस, निफ्टी आयटी (IT), निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये 1 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली.

निफ्टी 50 मधील केवळ 9 शेअर्समध्ये वाढ झाली, तर उर्वरित शेअर्स घसरणीसह बंद झाले. मॅक्स हेल्थकेअर, पॉवरग्रीड, भारती एअरटेल, बीईएल (BEL), नेस्ले इंडिया आणि टेक महिंद्रा या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली तर विप्रो (8.4 टक्के घसरण), जिओ फायनान्शियल, आयशर मोटर्स, हिंदाल्को आणि श्रीराम फायनान्समध्ये 3.6  टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली.

घसरणीची कारणे

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती

भू-राजकीय चिंता

जागतिक बाजारातील कमकुवत संकेत

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FIIs) सततची विक्री

रुपयाचे अवमूल्यन

इस्त्रायलने लेबनॉनवर आणि इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि इराण दरम्यान सुरु असणारा शांतता कराराच्या आशा आता मावळल्याने आणि संभाव्य युद्धविरामाबाबत चिंता वाढल्याने भारतीय बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे.

शिवराज्याभिषेक दिनी सोमेश्वरवाडीत रक्तदानाचा विक्रम; 1203 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

रुपया का घसरला?

मध्यपूर्वेतील तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरची वाढलेली मागणी यामुळे भारतीय रुपयाने मागील सत्रातील बहुतांश नफा गमावला. अमेरिकेतील रोजगारविषयक भक्कम आकडेवारीनंतरही रुपयावर दबाव वाढला असल्याची माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे दिलीप परमार यांनी दिली.

follow us