Joint Pain : हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होतोय? हे उपाय करा
मुंबई : हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. सर्दी, खोकला, ताप या वायरल इन्फेक्शनबरोबर इतर आजारही बळावतात. त्यातीलच एक म्हणजे सांधेदुखी. हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो, किंवा ज्यांना आधीपासून सांधेदुखीचा त्रास आहे त्यांचा त्रास हिवाळ्यात वाढतो असे तुम्ही ऐकले असेल. या असह्य त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय करूनही काही फरक जाणवत नाही. यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.
सांधेदुखीची कारणे
– हिवाळ्यात, आपल्या सांध्यांचे संरक्षण करणारे वंगण घट्ट होऊन यामुळे सांधे कडक होतात
– हिवाळ्यात सांध्याच्या नसा अधिक संवेदनशील होऊ शकतात, ज्यामुळे अस्वस्थता वाढू शकते
– लोक इतर ऋतूंपेक्षा हिवाळ्यात कमी सक्रिय असतात, जे सांध्यांनर दुष्परिणाम करतात
– हिवाळ्यात खांदे, पाय, हात आणि गुडघ्याच्या सांध्यामध्ये रक्ताभिसरण कमी झाल्याने स्नायुंमध्ये कडकपणा येतो
‘या’ पदार्थांचे सेवन टाळा
मीठ – यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जेवणात मीठ किती आहे याचीही काळजी घ्यावी लागते. संशोधकांच्या मते, उच्च सोडियमयुक्त आहार घेतल्यास संधिवात आणि ऑटोइम्यून रोगांचा धोका वाढू शकतो. सांधेदुखीचा त्रास टाळण्यासाठी डॉक्टरांकडून आहारात मिठाचे प्रमाण कमी करण्याचाही सल्ला दिला जातो.
दारू – जर तुम्हाला सांधेदुखीची समस्या असेल आणि तुम्ही दारूचे सेवन करत असाल तर ते आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते. एका संशोधनानुसार, मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये गाउट अटॅकची शक्यता आणि तीव्रता वाढण्याची शक्यता असते शकते.
तेलकट पदार्थ – याशिवाय फास्ट फूड खाणे देखील सांधेदुखीत हानिकारक आहे. बाहेरचे अन्नपदार्थ आणि प्रोसेस्ड फूड खाणे टाळा. तळलेले पदार्थ खाणे टाळा.
काही घरगुती उपाय
डाएटमध्ये बदल करा
जर हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढत असेल तर त्यासाठी डाएटमध्ये बदल करा. विटामिन डी असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. सूर्यप्रकाश देखील ‘विटामिन डी’ चे उत्तम स्रोत मानले जाते. अर्थरायटीसच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी मासे, वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या, फळं, दुध यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
उबदार कपड्यांचा वापर करा
हिवाळ्यात थंडीमुळे बऱ्याचदा सांधेदुखीचा त्रास वाढतो, त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी स्वेटर, मोजे अशा उबदार कपड्यांचा वापर करा.
जास्त व्यायाम करणे टाळा
जर तुम्हाला दररोज व्यायाम करण्याची सवय असेल, पण सांधेदुखीचा त्रास होत असेल. तर हा त्रास कमी करण्यासाठी जास्त आणि कठीण व्यायाम करणे टाळा. अर्थरायटीस असल्याला रुग्णांना व्यायाम करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.