ग्राहकांनो, संधी चुकवू नका! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे टाटाच्या अप्रतिम कार्स
Tata Cars Discount May 2024: देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीला (Maruti Suzuki) भारतीय बाजारात टक्कर देणारी भारतीय ऑटो कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) मे 2024 मध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक जरबदस्त डिस्काउंट ऑफर जाहीर केला आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये एक जबरदस्त कार खरेदी करू शकता.
उत्तम सेफ्टी फीचर्स, दमदार इंजिन आणि बेस्ट मायलेजमुळे भारतीय बाजारात टाटाच्या कार्सची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मे 2024 मध्ये टाटा मोटर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपली विक्री वाढवण्यासाठी आकर्षक सवलत आणि इतर ऑफर देत आहे.
टाटाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना कंपनी मे 2024 मध्ये 60 हजार रुपये रोख सवलतसह एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट फायदे देत आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही मे 2024 मध्ये टाटाच्या कोणत्या कार्स डिस्काउंट ऑफर अंतर्गत खरेदी करू शकता.
Tata Tiago Discount 2024
देशातील बाजारात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक असणारी कार Tata Tiago तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मे 2024 मध्ये तुम्ही Tata Tiago पेट्रोल XT(O), XT आणि XZ ट्रिम्सवर 60 हजारपर्यंत डिस्काउंट ऑफर मिळवू शकतात. या व्हेरियंटमध्ये तुम्हाला 45 हजारांची रोख सूट, 10 हजार रुपयांचा एक्सेंज बोनस आणि 5 हजार रुपयांचे कॉर्पोरेट फायदे मिळणार आहे.
तर दुसऱ्या पेट्रोल व्हेरियंटवर तुम्हाला 35 हजार रुपयांचा रोख बोनस आणि Tata Tiago CNG व्हेरियंटवर 25 हजार रुपयांचा रोख बोनस तसेच एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट फायदे मिळणार आहे.
Tata Tigor Discount 2024
कमी किमतीमध्ये जास्त मायलेज तसेच बेस्ट फीचर्ससह येणारी Tata Tigor वर देखील ग्राहकांना मे 2024 मध्ये जबरदस्त डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. ग्राहकांना या कारच्या XZ+ आणि XM व्हेरियंटवर 55 हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे. यामध्ये तुम्हाला 40 हजार रुपयांची रोख सूट तर 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचे कॉर्पोरेट फायदे मिळणार आहे. तर इतर Tata Tigor पेट्रोल व्हेरियंटवर तुम्हाला समान एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट फायद्यांसह 30,000 रुपये रोख सूट मिळत आहे. तर एक्सचेंज बोनस आणि Tata Tigor CNG व्हेरियंटवर 30 हजार रुपयांची रोख सूट आणि कॉर्पोरेट ऑफरशिवाय 10,000 रुपये एक्सचेंज बोनस कंपनीकडून देण्यात येत आहे.
Tata Altroz Discount 2024
भारतीय बाजारात जबरदस्त सेफ्टी फीचर्समुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी टाटा मोटर्सची लोकप्रिय कार Tata Altroz वर देखील ग्राहकांना मे 2024 डिस्कॉऊंट ऑफर देण्यात येत आहे.
Tata Altroz च्या डिझेल आणि पेट्रोलच्या MT व्हेरियंटवर ग्राहकांना 50 हजार रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला 35 हजार रुपयांची रोख सूट तर 10 हजार रुपयांचा एक्सेंज बोनस आणि 5 हजार रुपयांचे कॉर्पोरेट फायदे देण्यात येत आहे. तर Tata Altroz CNG व्हेरियंटवर ग्राहकांना 35 हजार रुपयांपर्यंत फायदे मिळणार आहे. यामध्ये 20 हजार रुपयांची रोख सवलत आणि एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूटचा समावेश आहे.
नगर हादरलं ! तरुणाच्या शरीराचे तुकडे करून कालव्यात फेकले..
Tata Nexon Discount 2024
गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात धुमाकूळ घालणारी टाटाची Tata Nexon देखील तुम्हाला आता डिस्काउंट ऑफर अंतर्गत खरेदी करता येणार आहे. या कारच्या डिझेल व्हेरियंटवर 20 हजार रुपयांची सूट तर कॉर्पोरेट फायदे म्हणून 15,000 रुपयांची सूट मिळणार आहे.