मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क
LetsUpp l Govt.Schemes
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना (Backward class Students)महाविद्यालयीन / उच्च शिक्षण घेता यावे, विद्यार्थ्याचे गळतिचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क.
योजनेच्या प्रमुख अटी :
● विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा
● विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखपेक्षा जास्त मात्र उच्च उत्पन्न मर्यादा नाही.
● विद्यार्थी शालांत परीक्षेत्तर व पुढील शिक्षण घेत असलेला असावा.
● विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
Devendra Fadnvis : अरे…हरामखोरांनो! सावरकरांनी इतर कैद्यांसाठी माफीचा अर्ज केला होता…
आवश्यक कागदपत्रे :
● विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला
● उत्पन्नाचा दाखला
● रहिवासी दाखला इ.
लाभाचे स्वरुप :
● शालांत परीक्षोत्तर शिक्षण घेणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे उत्पन्न विचारात न घेता सर्व मॅट्रिकोत्तर शैक्षणिक ● अभ्यासक्रमासाठी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर विहीत केलेले शुल्क देण्यात येते.
अर्ज करण्याची पध्दत : http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक.
संपर्क कार्यालयाचे नाव : जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि महाविद्यालयाचे प्राचार्य.
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)