प्रत्येक गोष्टीवर दुसऱ्यांच्या चुका काढणाऱ्यांचा स्वभाव कसा असतो? सायकोलॉजी काय सांगते?
प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ वंदना शर्मा यांच्या मते, प्रत्येक वेळी समोरच्याला त्रास देणं हा अशा लोकांचा उद्देश नसतो.
What does psychology say? : प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा माणूस नक्की असतो, जो प्रत्येक छोट्या गोष्टीवर आपल्याला टोकतो. आपण बोलताना एखादा शब्द चुकला, तारीख चुकवली किंवा एखादी साधी माहिती इकडे-तिकडे झाली, की तो लगेच मध्येच बोलतो नाही, असं नाही… हे खरं आहे! अशा लोकांना पाहून अनेकदा राग येतो किंवा ते आपल्याला खूप घमंडी वाटतात. पण मानसशास्त्र यावर काय सांगतं? प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ वंदना शर्मा यांच्या मते, प्रत्येक वेळी समोरच्याला त्रास देणं हा अशा लोकांचा उद्देश नसतो. या वागण्यामागे काही विशिष्ट मानसिक आणि वर्तणूक कारणीभूत असतात. चला, जाणून घेऊया यामागची नेमकी सायकोलॉजी…
अचूकतेची आणि फॅक्ट्सची प्रचंड आवड – मानसशास्त्रज्ञ वंदना शर्मा सांगतात की, काही लोकांचा मूळ स्वभावच अचूकतेवर आधारित असतो. त्यांना प्रत्येक गोष्टीत बारीक गोष्टी टिपायची सवय असते. जर त्यांना एखादी चूक दिसली, तर ती त्यांच्या मनाला खात राहते. जर ही चूक आत्ताच सुधारली नाही, तर चुकीची माहिती पुढे पसरेल, या विचाराने ते लगेच समोरच्याला करेक्ट करतात. काही लोकांचं निरीक्षण इतकं पक्के असतं की, ते क्षणात शब्द, तारीख किंवा तथ्ये पकडतात.
स्वतःला श्रेष्ठ आणि हुशार सिद्ध करण्याची इच्छा – सगळेच लोक साध्या हेतूने बोलत नाहीत. काही लोकांमध्ये स्वतःला खूप हुशार किंवा जाणकार दाखवण्याची सुप्त इच्छा असते. त्यांना असं वाटतं की, आपण जर लोकांच्या चुका काढल्या, तर समाज आपल्याला जास्त स्मार्ट समजेल. तसेच, बालपणीचे संगोपन सुद्धा याला कारणीभूत असू शकते. लहानपणी ज्या मुलांना प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट करायला शिकवलं गेलं, किंवा छोट्या-छोट्या चुकांवर जास्त टोकलं गेलं, ते मोठे झाल्यावर नकळतपणे हीच सवय इतरांवरही लागू करू लागतात.
नीट आंदोलन पेटण्याची चिन्हे; अभिजीत दीपके म्हणाले, अटक झाली तर लढा अधिक तीव्र होईल
मदत करण्याची भावना आणि बोलण्याची पद्धत – प्रत्येक वेळी कोणाची चूक सुधारण्याचा अर्थ त्याला चुकीचा ठरवणे नसतो. अनेक जण खरोखरच समोरच्याला मदत करण्यासाठी हे करतात, जेणेकरून तो ती चूक पुन्हा करणार नाही. मात्र, तो मुद्दा कसा मांडला जातो हे सर्वात महत्त्वाचं असतं. एखादी गोष्ट जर आदराने सांगितली जसे की, मला वाटंत एक छोटीशी चूक झाली, तर समोरची व्यक्ती ती सहज स्वीकारते. पण तीच गोष्ट सर्वांसमोर आणि सतत टोकून सांगितली, तर मात्र अपमानित फील होऊ शकतं.
थोडक्यात काय तर… तुमच्यावर सतत ताशेरे ओढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा उद्देश तुम्हाला त्रास देण्याचा असतोच असं नाही. काही लोकांचा स्वभाव अचूक असण्याचा असतो, तर काही जण फक्त योग्य माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. पण जर तुम्हालाही अशी सवय असेल, तर स्वतःला एकदा नक्की विचारा ‘ती चूक खरंच एवढी मोठी होती का? कारण मानसशास्त्र सांगतं की, नात्यांमध्ये नेहमी ‘स्वतःला बरोबर सिद्ध करण्यापेक्षा’ समोरच्याच्या भावनांची काळजी करणं जास्त महत्त्वाचं असतं. तुमच्याही परिचयात असा एखादा व्यक्ती असेल, जो वारंवार टोकतो, त्याला हा लेख नक्की शेअर करा..