‘चित्रा मेरी सासू’; उर्फीनं चित्रा वाघांना पुन्हा डिवचलं
मुंबई : ‘बिग बॉस’ फेम आणि अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाही. उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांवरून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. आता उर्फीन पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना ट्विटद्वारे डिवचलं आहे.
चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर उर्फी जावेद सध्या ट्विटच्या माध्यमातून उत्तर देताना दिसतेय. उर्फीनं यावेळी ट्विट करत म्हटलंय, ‘मेरी डिपी इतनी ठासू, चित्रा वाघ मेरी सासू’. या ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. चित्रा वाघांना उद्देशून उर्फीनं केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. यात उर्फीनं चित्रा वाघांना थेट आपली सासू म्हटलंय.
उर्फीने चित्रा वाघ यांना झापले
उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. चित्रा वाघांच्या तक्रारी नंतर उर्फीनं ट्विट करत चित्रा वाघांवर निशाणा साधला. तुमच्यसारखे राजकारणी माझा वापर करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याकडे तुम्ही का लक्ष देत नाही असा सवाल केला.
नेटकऱ्यांकडून विषयाची खिल्ली
एक नेटकरी म्हणाला, हे तर लव्ह जिहाद झालं. दुसरा नेटकरी म्हणाला, अजून आपली खिल्ली उडवण्याचं बाकी आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, उर्फी इतनी ढासू, चित्रा वाघके निकले आसूँ. आणखी एक नेटकरी म्हणाला, सासू बाई कोमात सून बाई जोमात, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी उर्फीच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.
चित्रा वाघ नेमक्या काय म्हणाल्या होत्या?
शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत, रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला…मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.