राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करू नका
मुंबई : फेब्रुवारी 2022 मध्येच पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका होणे गरजेचे असताना मात्र ओबीसी या घटकाला त्यांच्या संख्येच्या तुलनेत प्रतिनिधीत्व मिळत नव्हते. म्हणुन आम्ही न्यायालयात जाऊन त्यांना कसे प्रतिनिधित्व मिळेल यासाठी प्रयत्न केले. आता हे सर्व प्रश्न मार्गी लागले आहे, यामुळे आता महापालिका निवडणुका जाहीर केल्या पाहिजे असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. मात्र अद्यापही महापालिका निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. निवडणुका झाल्या की नवीन कार्यकर्त्यांना पदाची अपेक्षा असते. पदाच्या माध्यमातून शहराच्या विकासाची कामे त्यांना करायची असते.
हे सत्तेचे विकेंद्रीकरण असते. नगरसेवक शहर विकासासाठी प्रयत्न करतात. सध्या प्रशासक आहेत. प्रशासलकाला, आयुक्तांना मला कोणाचे तरी प्रेशर आहे असे सांगून चालणार नाही. कारण, सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात. नवीन बॉडी येईपर्यंत आयुक्तच प्रमुख राहणार आहेत. त्यामुळे राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम न करता. चांगल्या लोकांना आणि रिझनेबल ज्यांचे रेट आहेत असे लोकांना कामे दिली पाहिजेत, असेही पवार म्हणाले.
अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली काम करू नये. तसेच आताच्या राजकार्यत्यांच्या दबावाखाली काम करू नये, असे अजित पवार म्हणाले. तसेच पोलीस किंवा सरकारने कोणत्याही राजकीय हस्तक्षेप न करता आपआपल्या शहरातील कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, याकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे. असा सल्ला देखील पवार यांनी यावेळी दिला.