कलावंतांची कैफियत ऐका, अन्यथा ‘पद्मश्री’ परत करु; रघुवीर खेडकरांचा इशारा
कलावंतांची कैफियत ऐका, अन्यथा पद्मश्री पुरस्कार परत करु, असा थेट इशारा ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडकर यांनी दिला आहे.
Raghuvir Khedkar : कलावंतांची कैफियत ऐका, अन्यथा पद्मश्री पुरस्कार परत करु, असा थेट इशारा ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडकर (Raghuvir Khedkar) यांनी दिला आहे. पुण्यात सांस्कृतिक विभागाच्यावतीने समरसता साहित्य परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित न राहिल्याने रघुवीर खेडकर यांनी नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे.
Mansoon : नागरिकांनो काळजी घ्या…पुढील 24 तासांत धो-धो मुसळधार पाऊस कोसळणार
पुढे बोलताना रघुवीर खेडकर म्हणाले, मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्री पाच वर्षे त्यांच्या पदावर राहणार आहेत. त्यांनी नेहमीच दिवस-रात्र काम असणार आहे, परंतू लोककलावंतांची कैफियत ऐकून घेणे हे देखील त्यांचेच काम आहे. पुढील काळात एक महिन्याच्या कालावधीत पुन्हा अशाच संमेलनाचे आयोजन करुन मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री उपस्थित न राहिल्यास आपण पद्मश्री सन्मान परत करु असा थेट इशारा खेडकर यांनी दिला आहे.
समरसता लोककला संमेलनात ज्येष्ठ अभिनेत्रा मधू कांबीकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांची प्रकृतीच्या कारणामुळे त्यांच्या भगिनी रत्ना कांबीकर यांनी यावेळी पुरस्कार स्वीकारला. यावेळी मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अविनाश आलेगावकर, लोककलावंत नंदेश उमप, मंगला बनसोडे, ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, आदी उपस्थित होते.
वाघाचं कातडं पांघरलेला हा लांडगा होता; ओमराजे निंबाळकरांवर उद्धव ठाकरेंचा घणाघाती वार
उद्घाटनाच्या सत्राची सुरुवात स्वरानुभव भजनी मंडळाच्या गणेश स्तवनाने झाली. फोक प्रबोधनाच्या युवा वादकांनी सादर केलेल्या ढोल, ताशा, मृदंग, दिमडी, ढोलकी, डफ पायपेटी या पारंपारिक वाद्यांच्या जोशपूर्ण वादनाने संमेलनात नवचैतन्य निर्माण केले. शांती ब्रम्ह गुरुकुलच्या वादकांनी पारंपारिक वारकरी पद्धतीने मृदंगवादन केले.