घरफोडी करणारे दोघे संशयित जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
Ahilyanagar Local Crime Branch : श्रीरामपूर तालुक्यात घरफोडी करणारी दोघे संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.
Ahilyanagar Local Crime Branch : श्रीरामपूर तालुक्यात घरफोडी करणारी दोघे संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तब्बल सहा लाख 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. स्वरुप उर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे (वय- 30), द-या परांड्या भोसले (वय-35, दोघे रा. अंतापुर, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी सोपान चंद्रभान थोरात हे 16 मे रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वा.चे दरम्यान त्यांचे घरापासुन सुमारे 200 मी लांब असलेल्या वस्तीवर जेवणासाठी गेले असता कोणीतरी अज्ञात चोट्यांनी घराचे कुलुप तोडुन कपाटातील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा एकुण 4,06,000/-रु कि.चा मुद्देमाल लबाडीने फिर्यादीचे संमतीशिवाय चोरुन नेले आहे. सदर घटनेबाबत श्रीरामपुर तालुका, पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी तात्काळ ताब्यात घेणे बाबत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना आदेशित केले होते. त्यानुसार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करुन पथकास घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी तात्काळ ताब्यात घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.
वर नमूद पथकाने घरफोडी गुन्ह्यामधील आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे स्वरुप उर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे व त्याचे साथीदार परांड्या भोसले दोघे रा. अंतापुर ता.गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर यांनी केलेला असुन ते सद्या घोडेगाव ते शनि शिंगणापुर जाणारे रोडवर पाट्याच्याकडेला बसलेले असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन त्यांना ताब्यात घेणे जात असतांना त्यांना पोलीसांची चाहुल लागताच ते पळुन जावु लागले तेव्हा पथकाने त्यांचे पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे 1) स्वरुप उर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे वय- 30 वर्षे, 2) द-या परांड्या भोसले वय- 35 वर्षे दोघे रा. अंतापुर, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. ताब्यात आरोपीतांना सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपीचे कब्जातुन व सांगणेवरुन 6,50,000/-रु कि.ची 50 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, 40,000/-रु कि.ची एक मोटार सायकल असा एकुण 6,90,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडे त्यांनी आणखी अशा प्रकारे गुन्हे केले आहेत काय याबाबत सखोल तपास करता आरोपीकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत.
पुणे, अहिल्यानगर, मुंबईसह 25 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान अपडेट
आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी श्रीरामपुर तालुका पोलीस ठाणे येथे हजर करुन त्यांना अटक करण्यात आली असुन पुढील तपास श्रीरामपुर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहे. सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.