लंकेंसह काँग्रेसच्या चव्हाणांची माघार…, तनपुरेंसाठी आघाडीचा छुपा डाव ?
Prajakt Tanpure : विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यापासून अहिल्यानगर मधील राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडून आल्या आहेत.
Prajakt Tanpure : विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यापासून अहिल्यानगर मधील राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडून आल्या आहेत. यातच अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीच्या हक्काच्या असलेल्या जागेवर खासदार लंके यांच्या पत्नी लढणार होत्या मात्र त्यांनी माघार घेतली तर काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळालेला असताना देखील पक्षाकडून अर्ज दाखल करण्यात आला नाही. यामुळे महाविकास आघाडीकडून माघार तसेच अपक्ष निवडणूक लढवत एक प्रकारे प्राजक्त तनपुरेंसाठी एक मदतीचा हात देत आघाडी कडून छुपा डाव खेळण्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून सत्यजित कदम यांच्यासह चंद्रशेखर घुले तर राष्ट्रवादीच्या हक्काची जागा असलेल्या या जागेवरती आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप हे इच्छुक होते मात्र राहुरी पोट निवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांच्यासाठी निवडणुकीतून माघार घेतलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या त्यागाच्या बदल्यात भाजपकडून तनपुरे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री विखे यांनी सत्यजित कदम यांच्यासह सचिन जगताप यांच्याशी संवाद साधला व अर्ज दाखल करू नये यासाठी दोघांनाही गळ घातल्याने तनपुरे यांची वाट सुकूर झाली.
बिनविरोधसाठी आघाडीचा डाव राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या तनपुरे यांना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे महाविकास आघाडी कोण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून राणी लंके या अर्ज दाखल करणार असल्याचे माहिती त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले त्याचबरोबर काँग्रेसकडून देखील आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याचे ठरले त्यानुसार नगर काँग्रेसचे शहराध्यक्ष दीप चव्हाण यांना पक्षाने एबी फॉर्म दिला मात्र चव्हाण यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून का रोखण्यात आले तसेच लंके यांनी अर्ज का दाखल केला नाही यावरून तर तर्कवितर्क लावले जात होते तसेच तनपुरे यांचा विजय सोपा व्हावे यासाठी आघाडीनेच हा डाव टाकल्याचे देखील बोलले जाते
महाविकास आघाडीचा गोंधळ चव्हाट्यावर
2023 मध्ये पदवीधर मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणूकच पुनरावृत्ती या निवडणुकीत पाहायला मिळाले. महाविकास आघाडीत नगरची जागा काँग्रेसला सुटली पक्षाचा एबी फॉर्म याला मात्र शेवटच्या श्रेणी उमेदवारांनी अर्जच दाखल केलाने आश्चर्य व्यक्त केले गेले तसेच लंके यांनीही ऐनवेळी अर्ज न भरल्याने आघाडीतील गोंधळ या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर दिसला दरम्यान पदवीधर निवडणुकीमध्ये देखील डॉक्टर सुधीर तांबे यांच्यासाठी काँग्रेसचा एबी फॉर्म आला पण तो उशिरा आल्याने डॉक्टर तांबे यांनी अर्ज भरला नाही आणि सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला व ते निवडून आले.
आघाडीत बिघाडी नेत्यांसह कार्यकर्ते गोंधळलेले
विधान परिषदेसाठी राणी लंके या उमेदवारी अर्ज दाखल करणार असं ठरलं होतं मात्र ही जागा काँग्रेसला गेल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार लंके यांनी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला तसेच आघाडी धर्म पाळत काँग्रेसचे उमेदवाराला मतदान करण्याचे देखील ठरलं. यामुळे लंके यांनी माघार घेतल्याचं बोललं जातं तर दुसरीकडे काँग्रेसचे बी फॉर्म मिळाला असून मात्र शरद पवार गटाने अर्ज दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचल्याने अर्ज दाखल करू नका अशा सूचना आपल्याला मिळाल्याच काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण म्हणाले यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्येच संभ्रमाची अवस्था असल्याचे देखील पुन्हा एकदा अधोरेखित झाले.