नगरच्या 300 युवकांचं पंढरपुरात स्वच्छता अभियान; तरुणांकडून पांडुरंगाची अनोखी सेवा
Pandharpur Cleanliness Drive : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरमध्ये (Pandharpur)विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाला येतात. मात्र, नगरच्या 300 युवकांनी पंढरपूर मध्ये आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi)दुसऱ्या दिवशी (दि.1 जुलै) स्वच्छता अभियान राबवत पांडुरंगाची अनोखी सेवा केली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या (Art of Living)माध्यमातून आणि समाजसेवक अमर कळमकर (Amar Kalamkar)यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा चेतना फाउंडेशनच्या सहकार्याने हे अभियान राबवण्यात आले. या वर्षी या अभियानाला तब्बल 10 वर्ष पूर्ण होत आहेत.(ahmednagar youth Pandharpur Cleanliness Drive 300 youths participated Art of Living)
मुंबईसह महाराष्ट्रातील ‘या’ भागात जोरदार पाऊस; कोकणसह पुण्याला यलो अलर्ट
या अभियानामध्ये काही युवक पुणे, नगर, कोपरगाव, बीड येथून सहभागी झाले होते. या स्वयंसेवकांनी हे स्वच्छता अभियान राबवत सुमारे पाच ट्रक कचरा पंढरपुरातून आषाढीच्या दुसऱ्या दिवशी जमा करून त्याची विल्हेवाट लावली. आषाढी वारीनंतर पंढरपूर परिसरात जे घाणीचे सम्राज्य पसरते, ते स्वच्छ करण्याचे काम नगरमधील या 300 युवकांनी केले. तसेच गेल्या 10 वर्षापासून हे कार्य सुरू आहे.
पॅन-आधार लिंकिंगसाठी मोठा दिलासा, जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा
सामाजिक भान ठेवत तसेच कुठल्याही प्रकारच्या वा कुणाच्या मदतीची अपेक्षा न ठेवता नगरच्या तरुणांनी स्वच्छतेचे काम केले. सकाळी 8 आठ वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असं पूर्ण दिवसभर स्वच्छता केलं.
यासाठी स्वयंसेवकांची विविध पथके वेगवेगळे करून जवळपास 12 ट्रक पेक्षा जास्त कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यामध्ये पंढरपुरातील ६५ एकराचा वारी तळ, गोपाळपूर, वाळवंट परिसर, चंद्रभागा नदी परिसर, भक्ती मार्ग आदी भाग स्वच्छ करण्यात आला.
यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा खच, द्रोण, ग्लास, केळीच्या साली, कुजलेले अन्न, तुटक्या चपला, पिशव्या, चंद्रभागेतील कठडे स्वच्छ करण्यात आले. या अभियानासाठी विशेष सहकार्य आमदार बबनदादा पाचपुते, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि युवा नेते उदयन गडाख यांचे सहकार्य लाभले.
स्वच्छतेच्या कार्याकडं सर्वांनी लक्ष देण्याची गरज
दहा वर्षापासून आषाढी एकादशीनंतर पंढरपूर मध्ये स्वच्छता अभियान आम्ही राबवत आहोत आणि आज त्याला दहा वर्ष पूर्ण झाले. यापुढेही ही सेवा अविरत सुरू राहील. स्वच्छतेच्या कार्याकडे खरंतर सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. आज आम्ही तब्बल 300 सहकाऱ्यांनी स्वच्छता अभियान केले. यापुढेही ही सेवा आम्ही अविरत सुरू ठेवणार आहोत. यामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावं, असे आवाहन मी आमच्यावतीने करतो.
अमर कळमकर
सामाजिक कार्यकर्ते नगर