15 वर्षांपासूनच्या खासदारकीत काय केले?; अजित पवार गटाचा सुप्रिया सुळेंवर थेट वार

15 वर्षांपासूनच्या खासदारकीत काय केले?; अजित पवार गटाचा सुप्रिया सुळेंवर थेट वार

NCP News : अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीत  (NCP) दोन गट पडले. आता या दोन्ही गटातील नेते आणि पदाधिकारी एकमेकांवर टीका करू लागले आहेत. अजित पवार गटातील नेत्यांनंतर आता पदाधिकारीही शरद पवार (Sharad Pawar) गटातील नेतृत्वावर टीका करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या उत्कृष्ट संसदपटू आहेत. दरवर्षी त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळतो. इंग्रजी, हिंदी भाषेवरील प्रभुत्व त्याच बरोबर शरद पवार नावाचे वलय त्यांच्यासोबत आहे याचा वापर करून हा पक्ष किमान दिल्लीत तरी वाढवायला हवा होता. वर्षातील 180 दिवस खासदार म्हणून तुम्ही दिल्लीतच होता. मग आजपर्यंत दिल्लीत साधा एक नगरसेवक निवडून आणता आला नाही, अशी टीका अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केली.

 अधिकृत माहिती नाही; CM शिंदे, अजितदादा अंतरवालीत येत असल्यास स्वागत : मनोज जरांगे

गोवा, गुजरात, मिझोराम नागालँड, बिहार याठिकाणी अजित पवार यांनी पक्ष वाढवायचा का?, असा सवाल पाटील यांनी केला. आम आदमी पार्टीला दोन राज्यात सत्ता मिळते. परंतु, राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा व्यापला नाही. अजित पवारांची कोंडी करायची आणि विनाकारण आपापले फॉलोअर्स वाढवले. अजित पवारांनी महाराष्ट्र पाहिला असता तर अडचण आली नसती असेही पाटील (Umesh Patil) म्हणाले.

राष्ट्रीय पक्ष म्हणून सांगायचे. पण, या पातळीवर कुठेतरी एखाद दुसरा आमदार निवडून येणार. गोव्यात तर पक्ष संपला. महाराष्ट्रात हेलपाटे मारत बसण्यापेक्षा देशभर फिरून पक्ष वाढवला असता तर आज पक्ष खूप मोठा झाला असता. मला प्रदेशाध्यक्ष करा असे म्हणण्याची वेळ अजितदादांवर यावी, इतके त्यांचे व्यक्तिमत्व छोटे झाले का?, असा सवाल पाटील यांनी केला. कुवत नसलेल्या माणसाच्या हातात सूत्रे दिली की पक्ष बुडणार हे निश्चित होते. त्यासाठीच पक्ष वाचविण्यासाठी अजितदादांनी ठाम भूमिका घेतली, असे पाटील म्हणाले.

भाजपचा ‘कमळा’चा डाव! राऊत म्हणाले, 2024 मध्ये लोक यांच्या तोंडाला…

दरम्यान, सध्या राष्ट्रवादीतील दोन्ही गटात वाद वाढत चालला आहे. शरद पवारांकडून जाहीर सभा घेऊन अजित पवार गटाचा चांगलाच पंचनामा केला जात आहे. या सभांना प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटाकडून उत्तर सभा घेतल्या जात आहेत. या सभांतूनही शरद पवार गटावर टीका करण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा सध्या बंद असल्या तरी राष्ट्रवादीतीलच या दोन गटांच्या सभांनीही राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube