Video : समृद्धीवर फडणवीसांनी गाडी चालवयाला घेताच…; अजितदादांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Ajit Pawar On Samruddhi Highway : इगतपुरी येथे आज समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह कॅबिनेटमधील इतर मंत्री आणि आधिकारी उपस्थित होते. लोकार्पणानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी समृद्धी महामार्गावरुन केलेल्या ड्रॉयव्हिंग टेस्टिंगचा एक किस्साही सांगितला.
लोकार्पणानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, समृद्धी मार्गावरुन जाताना आमच्या गाडीचं सारथ्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होतो तर मी मागे बसलो होतो. गाडी व्यवस्थित चालत आहे की नाही हे मी पाहत होतो आणि माझ्या जोडीला अनिल गायकवाड आणि मनिषाताई होत्या. जाताना गाडी व्यवस्थित गेली. ही सुरुवात होती. त्यामुळे धोका न पत्कारता एकनाथ शिंदेंनी सारथ्य केलं असं अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारथ्य केलं. मी म्हटलं हे बाबा गाडीवर बसल्यावर ही गाडी चालणार नाही. आपण एलसी घेऊया. एलसी निरंजन डावखरे यांची होतीच. त्याला सांगितलं की गाडी दे, त्याने लगेच गाडी दिली. मुख्यमंत्री फडणवीसांनी गाडी चालवयाला घेताच गाडीने 100 चा स्पीड घेतला. मग 120 च्या स्पीडने गाडी जाऊ लागली. टनल येईलपर्यंत गाडीचा स्पीड 120 होता. गाडी चालवताना त्यांनी सर्व नियमांचे पालन केले त्यामुळे आम्हाला आम्ही उतरवलेल्या विम्याचा उपयोग करावा लागला नाही असं अजित पवार म्हणाले.
खासदार महुआ मोइत्रा दुसऱ्यांदा विवाहबंधनात; जीवनसाथी 65 वर्षीय पिनाकी मिश्रा कोण?
तर यावेळी समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्यांवर देखील अजित पवार यांनी हल्लाबोल केला. यावेळी अजित पवार म्हणाले की, हा प्रकल्प सुरु असताना अनेकांनी याला विरोध केला होता. संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये आम्हाला या प्रकल्पाला विरोध करा असं सांगितले होते मात्र जेव्हा सरकारकडून जमिनीचे दर जाहीर करण्यात आले तेव्हा ज्यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता त्यांनीच जाऊन पैसे घेतले असं अजित पवार म्हणाले.