Amruta Fadnavis On Manoj Jarange : मनोज जरांगे माझे भाऊ, त्यांना घरी जेवायला निमंत्रण देते
Amruta Fadnavis On Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून
Amruta Fadnavis On Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून आंतरवली सराटीत उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 12 दिवस असून ज्यापर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार अशी भूमिका त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली आहे. माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहे.
तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) माझे भाऊ आहे त्यांना मी घरी जेवायला निमंत्रण देते असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केले आहे. नागपुरात आयोजित दहीहंडी महोत्सवात बोलताना केलेल्या वक्तव्याची सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात जोराने चर्चा पाहायला मिळत आहे. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देणार याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
कायमचा तोडगा काढा
तर दुसरीकडे जोपर्यंत कायमचा तोडगा निघथ नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला आहे. जरांगे पाटील यांच्याशी राज्य सरकारच्या शिष्टमंडळांने देखील चर्चा केली आहे मात्र जरांगे पाटील यांच्या मागण्यावर काही तोडगा निघालेला नाही. यातच अमृता फडणवीस यांनी जरांगे पाटील यांना घरी जेवणाचं निमंत्रण दिल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढणार; अलर्ट जारी; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज-
तर 12 सप्टेंबर रोजी मराठा समाजाला आंतरवली सराटी येथे येण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर जालन्याच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल बुधवार आणि गुरुवारी शहरातील दारुची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. काही अनुचीत प्रकार, दंगली घडू नये यासाठी हे आदेश देण्यात आल्याची माहिती जालन्याच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी दिली आहे.