मोठी बातमी… कोकण मंडळाच्या घरांसाठी अर्ज आणि सोडतीची तारीख ठरली
मुंबई : कोकण (Konkan Board Lottery) मंडळाच्या 4 हजार 752 घरांसाठी अर्ज विक्री आणि सोडतीची तारीख ठरली आहे. बुधवार 8 मार्चपासून अर्ज विक्री होणार आहे. तर 10 मे 2023 ला सोडत निघणार आहे. याबाबतची माहिती म्हाडाने जाहीर केली आहे.
कमी किंमतीत आणि हक्काचे घर मिळवण्यासाठी प्रत्येक जण म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहतो. आता त्यांची प्रतिक्षा संपली आहे. होळीच्या दिवशी म्हणजे सोमवारी 6 मार्चला 4 हजार 752 घरांसाठी जाहीर प्रसिद्ध होणार आहे. तर बुधवार 8 मार्चपासून अर्ज विक्री होणार आहे.
10 मे 2023 ला ठाण्यात याची सोडत निघणार आहे. घरांच्या किमती 13 लाख रुपयांपासून सुरू होत असून, घरांच्या क्षेत्रफळानुसार घरांच्या किमतीमध्ये बदल होत आहेत. 13 लाखांपासून सुरू झालेल्या किमती 25 लाखांपर्यंत असणार आहेत.
होळीत रंग खेळताना अशा पद्धतीने घ्या केसांची काळजी
घरांची विभागणी
सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत 1456 घरांचा समावेश असून ही घरे ठाणे, पालघर, कल्याण, वसई, नवी मुंबई, सानपाडा आणि विरार येथे आहेत. म्हाडा कोकण गृहनिर्माण योजनेत घरे आणि भूखंडाचा समावेश आहे. रायगड, कल्याण, पेण, अंबरनाथ, बदलापूर, सिंधुदुर्गमध्ये घरे, भूखंड असून, त्यांची संख्या 166 आहे. कोकण गृहनिर्माण योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत 2048 विखुरलेली घरे विरार येथे आहेत.
ऑस्ट्रेलियात घुमला ‘जय भवानी, जय शिवाजी’ जयघोष
या आहेत महत्वाच्या तारखा
कोकण मंडळ विभागाची सोडत जाहिरात – सोमवारी 6 मार्च 2023
अर्ज विक्री – बुधवार 8 मार्च 2023
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2023
सोडत – 10 मे 2023
स्थळ – डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
वेळ – सकाळी 10 वाजता.
कोणासाठी – अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गट
एकूण घरं – 4,752
पंतप्रधान आवास योजना – 984 घरं
1,554 घरं 20 टक्के योजनेनुसार
उर्वरित घरं म्हाडा गृहनिर्माण योजनेतर्गंत