ऑस्ट्रेलियात घुमला ‘जय भवानी, जय शिवाजी’ जयघोष

ऑस्ट्रेलियात घुमला ‘जय भवानी, जय शिवाजी’ जयघोष

सिडनी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सिडनी शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जमलेल्या शिवप्रेमींनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी सिडनी परिसर दणाणून सोडला.

ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde) देखील सहभागी झाले होते. प्रविण तरडेंनी मिरवणुकीतून फेसबुक लाईव्ह करीत माहिती दिली. यावेळी संपूर्ण ऑस्ट्रेलियातून मराठी माणसं एकत्र आली होती.

हेही वाचा
होळीत रंग खेळताना अशा पदध्तीने घ्या केसांची काळजी

सिडनी शहरातून काढण्यात भव्य मिरवणुकीत सहभागी झालेल्या शिवप्रेमींनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. ढाले ताशाचे वाद्य, भगव्या झेंडे, भगव्या रंगाचे फेटे बांधलेले स्त्री-पुरुष, विठ्ठल रखुमाईचा पेहराव केलेले लहान मुलं-मुली मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता.

प्रविण तरडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आज साजरी केली जातीय. दरवर्षी सुट्टीच्या दिवशी संपूर्ण ऑस्ट्रेलियातील मराठी बांधव शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. सह्याद्री सिडनी यांच्या वतीने शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube