नामांतरावरून भालचंद्र नेमाडेंचा हल्लाबोल; म्हणाले, नावं बदलणारे लोक क्षुद्र

नामांतरावरून भालचंद्र नेमाडेंचा हल्लाबोल; म्हणाले, नावं बदलणारे लोक क्षुद्र

Bhalchandra Nemade : औरंगाबाद (Aurangabad)आणि उस्मानाबाद (Osmanabad)या शहरांचं नामांतरावरुन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade)यांनी जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलणारे क्षुद्र आहेत. त्यातून काहीच साध्य होणार नसल्याचंही नेमांडेंनी स्पष्टपणे म्हटलंय. भालचंद्र नेमाडेंची सयाजी शिंदे (Sayaji Shinde)आणि त्यांच्या सह्याद्री देवराई (Sahyadri Devrai)संस्थेमार्फत देशी बियाणांच्या माध्यमातून बीजतुला (Bijtula) करण्यात आली. या वेगवगेळ्या प्रकारच्या देशी बियाणांची रोपं तयार करून त्यांची राज्यातील वेगवगळ्या भागात लागवड करण्यात येणार आहे. यानिमित्ताने भालचंद्र नेमाडेंनी एबीपी माझाशी विविध विषयांवर संवाद साधला.

गौतमीवर अजितदादा म्हणाले…सगळ्यांना पाहता येईल असं काम करावे

यावेळी नेमाडे म्हणाले की, औरंगाबादला आधी पाणी द्या, त्याचबरोबर चांगली झाडं लावण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला आहे. त्याचवेळी हडप्पा आणि मोहंजोदाडो संस्कृती जशी नष्ट झाली तशी आपल्या संस्कृतीच्या अंताची सुरुवात झाली असल्याची भीतीही नेमाडेंनी व्यक्त केली आहे. देशामध्ये लोकशाही धोक्यात आली असून खरं बोलणाऱ्याला पोलीस संरक्षणामध्ये फिरावं लागत असल्याचं परखड मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं आहे.

भालचंद्र नेंमाडेंनी ‘हिंदू’च्या पुढच्या भागामध्ये काय असणार आहे? खंडेरावचा प्रवास कसा असेल? इथपासून ते देशीवादाची आजची अवस्था, प्रमाण मराठी भाषा कशाला म्हणायचं? इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे नक्की काय होतंय? शहरांची नावं बदलल्यामुळे नक्की काय साध्य होतं? आज लोकशाही धोक्यात आलीय अशा विविध विषयांवर त्यांनी आपल्या सडेतोड शैलीमध्ये भाष्य केलं आहे.

प्रमाण मराठी भाषेबद्दल प्रश्न केला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, प्रमाण भाषा वगैरे असं काही नसतं, प्रत्येकाची भाषा शुद्ध आणि तेवढीच प्रमाण असते. त्यांनी सांगितले की, इंग्रजांनी मराठी भाषेचा कोष तयार करण्याचे काम चित्पावन ब्राह्मणांना दिले होते. त्यामुळे पुण्यातील भाषा प्रमाण मानली जात असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

भालचंद्र नेमाडेंनी आपल्या हिंदू या कादंबरीबद्दल म्हणाले की, हिंदूच्या पुढच्या भागात खंडेराव हा पुरातत्व विभागात नोकरी सुरु करतो. त्यात संशोधन करताना तो तक्षशीलेला पोहोचतो. त्यावेळी त्याला ग्रीस आणि युरोपातून येथे अनेक लोक शिक्षणासाठी येत असल्याचे समजते, अशा काही गोष्टींची यावेळी त्यांनी माहिती दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube