ईडीच्या विळख्यात असलेल्या अनिल परबांना धक्का, साई रिसॉर्टवर जप्ती

ईडीच्या विळख्यात असलेल्या अनिल परबांना धक्का, साई रिसॉर्टवर जप्ती

रत्नागिरी : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची संपत्तीवर ईडीकडून जप्ती करण्यात आली आहे. अनिल परबांच्या साई रिसॉर्टप्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली असून त्यांची एकूण 10.20 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. यासंदर्भात ईडीकडून ट्विटरद्वारे माहिती देण्यात आलीय.

दरम्यान, या प्रकरणाशी माझा काही संबंध नसून कारवाई झाली असेल तर याबाबत मी कोर्टात दाद मागणार असल्याचे अनिल परब यांनी ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर स्पष्टीकरण दिले आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. रत्नागिरीस्थित असलेल्या साई रिसॉर्टचा यामध्ये समावेश असून हे रिसॉर्ट एकूण 42 गुंठ्यात आहे.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तक्रारीच्या आधारवर ईडीकडून कारवाई करण्यात आल्याचं ईडीकडून सांगण्यात आलंय. दापोलीतील साई रिसॉर्टशी संबधित प्रकरणी ईडीकडून अनिल परब यांची अनेक वेळा चौकशी झाली.

शिवाय साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने सात ठिकाणी छापेमारी देखील केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्टप्रकरण लावून धरले होते. अखेर ईडीकडून तात्पुरत्या स्वरुपात साई रिसॉर्टवर जप्ती करण्यात आलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube