रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादात ठिणगी! तटकरेंकडून ध्वजारोहन कसे? गोगावले समर्थक आक्रमक

Controversy over the post of Guardian Minister of Raigad Tatkare hoist the flag Gogavale supporters aggressive : राज्यामध्ये भाजप आणि महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांनी वादात सापडलेली पालकमंत्र्यांची नियुक्ती देखील करण्यात आली. मात्र यामध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा मात्र कायम आहे. यामध्येच आता आणखी भर पडली आहे. ती एक मे रोजी असलेल्या महाराष्ट्र दिनी होणाऱ्या झेंडावंदनावरून
नेमकं काय झालं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारी रोजी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन तर रायगडसाठी आदिती तटकरे यांच्या नावाची निवड करण्यात आली होती. मात्र यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक आक्रमक झाले. त्यांनी थेट मुंबई-गोवा महामार्गावर उतरून टायर जाळत रस्ता रोको केला. त्याचबरोबर दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून देखील दादा भुसे यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदा बाबत तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.
काहीतरी मोठं घडणार? वेळ अन् टार्गेट तुम्हीच ठरवा, PM मोदींचा सैन्याला फ्रि हँड
मात्र आता गुरुवारी एक मे रोजी असलेल्या महाराष्ट्र दिनी होणाऱ्या झेंडावंदनाला पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करायचे असते म्हणून आदिती तटकरे या हे झेंडावंदन करणार आहेत मात्र सध्या त्या पालकमंत्री या पदावर रुजू नसताना त्यांनी हे झेंडावंदन करणं चुकीचं असल्याचं म्हणत शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. तसेच पालकमंत्री पदाची संधी ही भरत गोगावले यांना देखील दिली गेली पाहिजे. दुसरीकडे पालकमंत्री नसलेल्या तटकरे या ध्वजारोहन कसे काय करणार? असा संताप देखील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.