Deepak Kesarkar : दिपक केसरकर यांनी घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. त्याला आता शिवसेनेचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्या राज ठाकरे जरी कोकणात आले तर तुमच्या सभेपेक्षा दुप्पट लोकांची गर्दी होईल, असा खोचक टोला केसरकर यांनी लगावला.
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य दिपक केसरकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन शिर्डीत येऊन घेतले आहे. यावेळी साई संस्थानचा सुरक्षा रक्षकांनी मंदीर परीसरात मोठी सुरक्षा वाढवली आहे. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन दिपक केसरकर साईचरनी लीन झाले. दर्शनानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा : राबडीदेवीनंतर आज लालूंचा नंबर, लॅण्ड फॉर जॉब घोटाळ्यात सीबीआय करणार चौकशी
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. त्याला आता शिवसेनेचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्या राज ठाकरे जरी कोकणात आले तर तुमच्या सभेपेक्षा दुप्पट लोकांची गर्दी होईल, असा खोचक टोला केसरकर यांनी लगावला.
तुम्ही नारायण राणेंना (Narayan Rane) पराभूत करण्यासाठी कोकणात आले होते. मात्र तुमच्याच उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले होते. तरीही नंतरच्या काळात कोकण तुमच्या मागे उभा राहिला. शाखाप्रमुखांना कधी वर्षा बंगल्याच्या जवळही फिरकू दिले जात नव्हते. आता म्हणता माझ्यावर अन्याय केला, असे सांगून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा तुमचा प्रयत्न सुरू आहे, असे केसरकर म्हणाले.