खाटू श्यामजींच्या भक्तांवर काळाचा घाला; धुळ्यातील 9 भाविकांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी

Khatu Shyam Devotees Rajasthan Accident: राजस्थानमध्ये खाटू श्यामजींच्या दर्शनावरून महाराष्ट्रात परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात.

Khatu Shyam Devotees Rajasthan Accident

Khatu Shyam Devotees Rajasthan Accident: राजस्थानमध्ये खाटू श्यामजींच्या दर्शनावरून महाराष्ट्रात परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ रविवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील 9 भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेकिंग: भाजप खासदार रामराव वडकुते यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; दिल्लीतील एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास

ट्रकला धडकून क्रूझर गाडीचा चक्काचूर

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील तीन कुटुंबे स्वतंत्र वाहनांतून खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी राजस्थानला गेली होती. दर्शन आटोपून महाराष्ट्रात परतत असताना शंभूपुरा गावाजवळ त्यांच्या क्रूझर गाडीची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, क्रूझर गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

या वाहनातून एकूण 16 जण प्रवास करत होते. अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताचे दृश्य अत्यंत भीषण होते. वाहनातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले.

पोलिसांकडून बचावकार्य, जखमींवर उपचार सुरू

अपघाताची माहिती मिळताच नाता पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने कोटा येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचे मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.

प्रशासनाकडून अपघाताची माहिती

या अपघाताबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी माहिती दिली. शंभूपुरा परिसरात मध्यरात्री 16 जणांना घेऊन जाणारे वाहन ट्रकला धडकले. हा अत्यंत दुःखद आणि वेदनादायी अपघात होता. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण खाटू श्यामजींच्या दर्शनानंतर महाराष्ट्रात परतत होते, असे त्यांनी सांगितले.

क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची राजकीय इनिंग सुरू?, भाजपच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीत मोठी जबाबदारी

सध्या जखमींना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, याला प्रशासनाचे प्राधान्य आहे. तसेच मृतांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

follow us