हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जत येथील प्रांत अधिकारी व तहसीलदार निलंबित

हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जत येथील प्रांत अधिकारी व तहसीलदार निलंबित

अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत येथील प्रांत अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांना गौण खनिज संदर्भात कारवाई करताना कुचराई केली म्हणून निलंबित करण्यात आले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत चौकशी करून कारवाई करण्यासाठी महसूल विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले होते. या बाबत आ. प्रा. राम शिंदे यांनी याबाबत विधानपरिषदेत प्रश्न मांडला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

कर्जत तालुक्यातील माळढोक अभय अरण्यासह कर्जत जामखेड तालुक्यातील पर्यावरणाची हानी होत असल्याने महसुल प्रशासनाने दोन्ही तालुक्यांतील खडीक्रेशर बंद ठेवण्यात आले होते. परंतु काही दिवसांपूर्वी प्रांत अधिकाऱ्यांनी सदर खडीक्रेशरवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई केल्याने खडी क्रेशर सुरू असल्याचे समोर आले.

याच अनुषंगाने हे बेकायदेशीर असल्याचे सांगत यातील दोषी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आ. प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषद सभागृहात केली होती. या निलंबनामुळे कर्जत व जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
and of during winter session

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube