मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, धडक बसल्याने कारला आग, 5 जणांचा जागीच मृत्यू

मालवाहू वाहनाची कारला मागून जोरदार धडक बसली, आणि त्यामुळे त्या कारने तत्काळ पेट घेतला.

Samruddhi Accident

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. (Samrudhhi) या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. वर्ध्यातील विरुळ गावाजवळ रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मालवाहू वाहनाची कारला मागून जोरदार धडक बसली, आणि त्यामुळे त्या कारने तत्काळ पेट घेतला. या आगीत कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गवर इथेनॉल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला होता. त्यामुळे दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू होती. विरूळ गावाजवळ मालवाहू वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो डायरेक्ट समोरच्या कारला जाऊन धडकला. ही धडक एवढी भीषण होती की कारने तत्काळ पेट घेतला. त्यातील प्रवाशांना खाली उतरण्याची, जीव वाचवण्याचीही संधी मिळाली नाही. दुर्दैवाने होरपळून चौघांचाही मृत्यू झाला.

दोन कुटुंबांमध्ये लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद; हाणामारीत एका तरुणाची हत्या

या अपघातानंतर समृद्धी महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. तर एका बाजूची वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू होती. अपघाताचे वृत्त समजताच महामार्ग पोलीस, पुलगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केले. जखमीला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तर दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथील कंपनीमध्ये माल भरल्यानंतर टेम्पोच्या मागील बाजूस पडदा बांधत असताना चालक टेम्पो आणि रॅम्प यांच्या दरम्यान अडकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

रांजणगाव एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये माल भरल्यानंतर टेम्पो चालक वाहनाच्या मागील बाजूस पडदा बांधत होता. याचवेळी तो टेम्पो आणि लोडिंग रॅम्प यांच्या दरम्यान अडकला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्याला तातडीने शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे रांजणगाव एमआयडीसी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताची रांजणगाव पोलिस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

follow us