दोन कुटुंबांमध्ये लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद; हाणामारीत एका तरुणाची हत्या

जखमी तरुणाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.

News Photo   2026 07 19T193731.600

जालना शहरात मागील काही दिवसांपासून (jalna) वातावरण शांत होते. पोलीस अधीक्षक तेजबीर सिंह संधू आणि अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून त्यांच्याकडून बाँड लिहून घेतल्याने शहरातील गुन्हेगारीवर बऱ्यापैकी आळा बसल्याचे चित्र होते.

मात्र, आज दुपारी सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वली मामू दर्गा परिसरात लहान मुलांच्या खेळण्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात सय्यद अमर रियाज (वय 18-19 वर्षे) या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.

त्याचं मुंडक छाटून माझ्याकडं आणा; नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग, बीडच्या परळीत जीवघेणा हल्ला

घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आरोपी फरार झाले होते.

जखमी तरुणाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणाचा तात्काळ तपास सुरू करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी दिली.

follow us