Breaking News : माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतांच्या कारला अपघात

Breaking News : माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतांच्या कारला अपघात

मुंबई : माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कारला अपघात (Accident) झालेला आहे. काशिमीरा भागात त्यांच्या कारला डंपरने धडक दिली असल्याची माहिती समोर आली आहे. या धडकेत दीपक सावंत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत आधिक माहिती अशी, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत (Deepak Sawant) पालघरला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करायला जात असताना काशिमीरा भागात त्यांच्या कारला डंपरने मागून धडक दिली.

या अपघातात कारचं मोठं नुकसान झाल असुन या अपघातात सांवत यांना गंभीर इजा झाली आहे. या अपघातात सांवत यांच्या मानेला आणि पाठीला मार लागलेला आहे. काशिमीरावरुन त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात आणण्यात आलं आहे.

माजी आरोग्य मंत्री
डिसेंबर 2014 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात दीपक सावंत यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. याचवेळी त्यांच्याकडे भंडारा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

दीपक सांवत नेमके आहे तरी कोण ?
दीपक सावंत हे विधानपरिषदेचे माजी सदस्य आहेत.
शिवसेनेकडून त्यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.
जुलै 2004 मध्ये त्यांची पहिल्यांदा विधानपरिषदेवर वर्णी लागली.
2006 आणि 2012 मध्ये ते पुन्हा निवडून आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube