अन्न सुरक्षा म्हणजे शिक्षा नाही; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर FSSAI प्रमुख स्पष्टच बोलले

Tukaram Mundhe : अन्न व औषधे प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांनी अन्न व औषधे प्रशासनाचे

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe : अन्न व औषधे प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांनी अन्न व औषधे प्रशासनाचे आयुक्त पद स्वीकारल्यापासून संपूर्ण राज्यात एफडीएकडून जोरदार कारवाई पाहायला मिळत आहे. आतपर्यंत एफडीएने राज्यात लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करत अनेकांवर कारवाई देखील केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या कामाची चर्चा केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशात होताना दिसत आहे. तर आता देशातील सर्वोच्च अन्न नियामक संस्था FSSAI चे सीईओ राजित पुनहानी यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच अन्न सुरक्षा विभागातील पद शिक्षेची पोस्टिंग नाही असं देखील यावेळी राजित पुनहानी म्हणाले आहे. तसेच जे या पोस्टिंगला शिक्षेची पोस्टिंग समजतात त्यांना त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे असं देखील यावेळी FSSAI चे CEO राजित पुनहानी म्हणाले.

इच्छाशक्ती असेल तर काम करता येतं

FSSAI चे सीईओ राजित पुनहानी (Rajit Punhani) यांनी एका मुलाखतीत तुकाराम मुंढेंच्या कामाचे कौतुक करत इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघतो या भूमिकेचे मुंढेंचे काम उदाहरण असल्याचे म्हटलं आहे. महाराष्ट्रातील अन्न सुरक्षा विभागाने (Tukaram Mundhe) अतिरिक्त मनुष्यबळाची भरती न करता विद्यमान टीमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. त्यामुळे इच्छाशक्ती आणि प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून उपलब्ध संसाधनांतही मोठे काम करता  येते असं या मुलाखतीमध्ये राजित पुनहानी म्हणाले.
अन्न सुरक्षा विभागाला ‘शिक्षेची पोस्टिंग’ का मानले जायचे?

या मुलाखतीमध्ये बोलताना पुनहानी म्हणाले की , अन्न सुरक्षा विभागाला पूर्वी आरोग्य विभागाच्या तुलनेत अपेक्षित महत्त्व दिले जात नव्हते. त्यामुळे अनेक अधिकारी या विभागाची जबाबदारी स्वीकारत नव्हते. तर अनेक ठिकाणी अन्न सुरक्षा आयुक्तांचा स्वतंत्र पदभार न देता अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवली जात होती. मात्र आता प्रत्येक राज्यात स्वतंत्र अन्न सुरक्षा आयुक्त असणे आवश्यक आहे. तुकाराम मुंढे यांच्या कामामुळे अन्न सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढण्यास मदत झाली आहे असं देखील यावेळी पुनहानी म्हणाले.

तुम्हाला मान्य नसेल तर पाकिस्तानात जा, सिद्धेश कदमांचा अमित ठाकरेंना थेट इशारा

अन्न व औषधे प्रशासन विभागाचे आयुक्त पद स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने एफडीएने राज्यातील अनेक रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्य व्यवसाय, गोदामे आणि इतर ठिकाणी छापे टाकत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या कारवाईत अनेक परवाने देखील निलंबित करत संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

follow us