राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात; पुन्हा शिवरायांबद्दल केले वादग्रस्त विधान

राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात; पुन्हा शिवरायांबद्दल केले वादग्रस्त विधान

मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. दरम्यान मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर संबंधित व्हिडीओ ट्विट देखील केला आहे.

ट्विट मध्ये म्हंटल…
‘राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख ! नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का?’, असा सवाल अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

राज्यपालांचं नेमकं वक्तव्य काय?
राज्यपालांनी हिंदीत याबाबत एक वक्तव्य केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. “सब लोग कहते हैं की शिवाजी होने चाहीए, चंद्रशेखर होने चाहीए, भगतसिंह होने चाहीए, नेताजी होने चाहीए, लेकीन मेरे घरमें नही तो दुसरे के घरमे होने चाहीए”, असं विधान राज्यपाल संबंधित व्हिडीओत करताना दिसत आहेत.

राज्यपालांकडून वारंवार अशी विधानं करण्यामागील कारण काय हे जरा महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिलं पाहिजे ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची जबाबदारी आहे, असं मला वाटतं. तसेच महाराष्ट्राच्या जनतेला हे कळू द्या की, अशाप्रकारे राज्यपाल उद्धटपणे वागत आहेत”, अशी टीका अमोल मिटकरींनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube