आई, तुम्ही गेल्यावर तात्या मला ओढून घ्यायचे… पर्वती प्रकरणाlत मुलीच्या एका वाक्याने आई-वडील सुन्न!
आईने सांगितले की, मी घरी आले तेव्हा माझ्या मुलीच्या अंगावर कपडे नव्हते आणि तिच्या शरीरावर नखांचे ओरखडे स्पष्ट दिसत होते.
Grandfather attempts to torture his grandson : नसरापूरमधील चिमुरड्या मुलीवरील अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच आता पुणे शहरातून आणखी एक संतापजनक घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. पर्वती परिसरात घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा घरातीलच नातेसंबंधावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या प्रकरणात ७० वर्षीय वृद्धाने आपल्या स्वतःच्या नातींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ही घटना घरातच घडली असून, मुलीचे आई-वडील उदरनिर्वाहासाठी बाहेर गेले असताना आरोपीने ही संधी साधल्याचे सांगितलं जात आहे. आई कपड्यांच्या दुकानात काम करते, तर वडील रिक्षा चालवतात.
त्यामुळे दिवसभर घरात मुलं एकटी राहण्याची वेळ येते, आणी याच परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपीने हा प्रकार केल्याचा आरोप आहे. घटनेच्या दिवशी संध्याकाळी सुमारे सात वाजता आरोपी घरात आला, त्याने आधी मुलीला खाऊ देऊन विश्वास संपादन केला आणि त्यानांतर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलगी घाबरून गेली, मात्र तिने कसाबसा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. रात्री साडेनऊच्या सुमारास आई घरी परतल्यानंतर मुलीने रडत-रडत संपूर्ण घटना सांगितली. आईने सांगितले की, मी घरी आले तेव्हा माझ्या मुलीच्या अंगावर कपडे नव्हते आणि तिच्या शरीरावर नखांचे ओरखडे स्पष्ट दिसत होते. तो क्षण माझ्यासाठी आयुष्यभर विसरण्यासारखा नाही.
या घटनेनंतर आई-वडिलांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी देखील तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासात मुलीच्या जबाबावरून आणि वैद्यकीय तपासणीतून घटनेची गंभीरता अधोरेखित झाली आहे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितले की, यापूर्वी देखील आजोबांनी तिच्यासोबत अशाच प्रकारचा गैरवर्तनाचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ती घाबरून घराबाहेर पळाली होती, मात्र लहान असल्यामुळे तिला सांगण्याची हिंमत झाली नव्हती. त्यामुळे हा प्रकार काही काळापासून सुरू असल्याची शकयता पोलीस तपासातून व्यक्त केली जात आहे.
आगोदर बाचाबाची नंतर थेट मारामारी; राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा
मुलीच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सुमारे वर्षभरापूर्वी माझ्या सासऱ्यांनी माझा मोबाईल चोराला होता. त्या घटनेनंतर मी त्यांना घरातून हाकलून दिले होते. त्यानंतर ते कुठे राहतात, याची आम्हाला माहिती नव्हती. मात्र ते आमच्या आसपासच राहत होते, हे काळ समजले. त्यांनी पुढे सांगितले की, लहान मुलांना कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही. त्याचा फायदा घेत हा प्रकार घडवण्यात आला.
पीडित मुलीच्या आईने व्यक्त केलेला संताप देखील तितकाच तीव्र आहे. ज्या व्यक्तीवर आम्ही विश्वास ठेवला, ज्याच्याशी आमचं रक्ताचं नातं आहे, त्याच व्यक्तीने असं घृणास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न केला. अशा माणसाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी तिची मागणी आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात कुटुंबाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नागरिकांना अफवा पसरवू नयेत, तसेच संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेने समाजात पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे, तो म्हणजे लहान मुलींची सुरक्षितता नेमकी कुठे आहे? घर, जे सर्वात सुरक्षित स्थान मानलं जातं, तेच जर धोक्याचं ठरत असेल, तर पालकांनी आणि समाजाने अधिक सजग होण्याची गरज आहे. अशा घटनांवर केवळ संताप व्यक्त करून चालणार नाही, तर कठोर काययदेशीर कारवाई, सामाजिक जागरूकता आणि मुलांना सुरक्षिततेबाबत शिक्षण देणं गरजेचं आहे.