ज्या ठिकणाहून कार्यकर्ता म्हणून परतलो तेथेच प्रदेशाध्यक्ष होऊन आलोय; हर्षवर्धन सपकाळांनी शेअर केला खास किस्सा

Harshvardhan Sapkal यांनी आपला एका कार्यकर्त्यापासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास केला. याचा एक खास किस्सा सांगितला.

Former MLA Harshvardhan Sapkal has been appointed as the congress state president

Harshvardhan Sapkal told about his journy from congress activist to state presidnet : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची जेव्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आले होते. एकतर हे नाव फारसं चर्चेतलं किंवा ऐकिवात नव्हतं. तसेच राज्यातील अनेक दिग्गज काँग्रेस नेते रांगेत असताना काँग्रेस हाय कमांडकडून मात्र महाराष्ट्राची कमान सपकाळ यांच्याकडे सोपवण्यात आली. याच हर्षवर्धन सपकाळ यांनी आता आपण कशाप्रकारे एका कार्यकर्त्यापासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास केला. याचा एक खास किस्सा पुण्यामध्ये सांगितला आहे.

कांदा उत्पादकांसाठी गुडन्यूज! सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवला, केंद्राचा महत्वाचा निर्णय

आज हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये पुणे शहर आणि ग्रामीण, पिंपरी चिंचवड शहर त्या ठिकाणच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एक खास किस्सा शेअर केला ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की याच काँग्रेस भवन मध्ये एकेकाळी म्हणजे 2006-7 साली शिबिर सुरू असताना मी या हॉलमध्येच मुक्कामी होतो. इथेच झोपलो होतो. दोन दिवस सत्र चालवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यावेळी मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून या भावनांमध्ये झोपलो होतो. मात्र आता मी याच भावनांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून परत आलो आहे. प्रवासाचा मला अत्यंत आनंद आहे.

कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?

हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्यातील काँग्रेसचे निष्ठावंत नेते असून ते गांधी घराण्याशी जवळीचे आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आतापर्यंत काँग्रेसच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. सध्या ते राजीव गांधी पंचायत राज संघटनचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

Tags

follow us