त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, विखेंचा संजय राऊतांना टोला
घोटाळे बाजांनी असे आरोप करणे आणि आम्ही त्याचे खुलासे करणे हे मला उचित वाटत नाही, त्यांच्या म्हणण्याला मी किंमत देत नाही. आणि त्यावर मला खुलासा करण्याची आवश्यकता वाटत नाही. संजय राऊतांच आमच्यावर दिवसेन दिवस प्रेम वाढत चालले आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. म्हणून ते कधीपण काहीपण बोलत असतात असा टोला यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंनी संजय राऊतांना लगावला ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (His head has been affected, Vikhe tells Sanjay Raut)
संजय राऊतांच काय ते कधीपण काहीपण बोलत असतात त्यांना एवढं कोणी मनावर घेत नाही. असे म्हणून विखेंनी संजय राऊतांचा 400 कोटींचा घोटाळ्याचा आरोप फेटाळून लावला .
देवेंद्र फडणवीस मोठं नेतृत्व, कोणीच डॅमेज करु शकत नाही; बावनकुळेंनी भरला दम
पुढे बदलीच्या आरोपावर बोलताना विखे म्हणतात राज्यात आतापर्यंत पहिल्यांदा महसूल खात्याच्या बदल्यात एवढी पारदर्शकता आली आहे. असे म्हणत महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना टोला लगावला. आत आत्तापर्यंत 200 पेक्षा अधिक बदल्या झाल्या आहेत. त्यातील फक्त 4 ते 5 बदल्यांना मॅड ने स्थगिती दिली आहे. असे यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या बदल्यावर बोलतांनी संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी पूर्ण माहिती घेऊन बोलावे. मला असे वाटते अंबादास दानवे यांचावर संजय राऊतांच्या परिणाम झाला असावा किंवा संजय राऊत यांचावर दानवेंचा परिणाम झाला असावा. म्हणून ते असे बोलत असावेत. मुदतपूर्व बदली झाल्यामुळे मॅडने त्या बदल्या थांबवल्या आहेत असे स्पष्टीकरण यावेळी विखेंनी दिले.