धाराशिव हादरलं! पत्नी आणि 8 वर्षांच्या मुलीची हत्या केली अन्…
धाराशिव जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.
राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांत सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत असून नांदेड जिल्ह्यात (Nanded) आठवडाभरात 4 ते 5 खूनाच्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे कौटुंबीक हिंसाचार आणि घरगुती वादावरुनही जीवघेण्या घटना घडत आहेत. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
स्वतःच्या पत्नी आणि अवघ्या 8 वर्षांच्या मुलीची वडिलांकडूनच कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे आरोपी स्वतःहून पोलिसात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यात 88 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर, मस्साजोगकडं राज्याचं लक्ष
अजित वासुदेव असे आरोपी वडिलांचे नाव असून लिंबाबाई अजित वासुदेव आणि त्यांची 8 वर्षीय मुलगी मानसीची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडांच्या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. मात्र, आरोपी स्वतःहून मुरूम पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केलाय.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात एका निर्दयी आईने आपल्या अवघ्या 11 महिन्यांच्या पोटच्या मुलाची सिमेंटच्या ओट्यावर आपटून हत्या केली. धक्कादायक म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी तिने चिमुरड्याचा मृतदेह बॅगेत दगड भरून विहिरीत फेकून दिला. मात्र, रांजणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत या क्रूर घटनेचा पर्दाफाश केला आहे.