चॅलेंज देतो मुलीचं लग्न टोलेजंग करणार; इंदुरीकर महाराजांचा व्हिडीओ व्हायरल

Indurikar Maharaj : कीर्तनकार इंदुरीकर महाराज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. आपल्या कीर्तनमध्ये लोकांना साधेपणाने

  • Written By: Published:
Indurikar Maharaj

Indurikar Maharaj : कीर्तनकार इंदुरीकर महाराज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. आपल्या कीर्तनमध्ये लोकांना साधेपणाने लग्न करण्याचा सल्ला देणारे इंदुरीकर महाराज यांनी आपल्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात केल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. यानंतर लोकांनी माझ्या कुटुंबियांवर टीका करण्यास सुरुवात केल्याने आता आपण कीर्तन सेवेतून निवृत्त होणार असल्याचे संकेत इंदुरीकर महाराज यांनी दिले होते मात्र आता सोशल मीडियावर त्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये महाराज (Indurikar Maharaj) आपल्या मुलीचा लग्न साखरपुड्यापेक्षाही टोलेजंग करणार असं म्हणत आहे. सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकं अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये इंदुरीकर महाराज म्हणत आहे की, मला माहित होतं की, या औलादी माझ्या मुळावर उठवणार आहेत. त्यांना चॅलेंज देऊन सांगतो मी लग्न याच्यापेक्षाही टोलेजंग करणार आहे, बघू कोणाचं म्हणणं आहे ते. असं म्हणत त्यांनी 30 मिनिटांच्या सभेसाठी तीन कोटीचा खर्च होतो मात्र तेव्हा कोणत्याही चँनेलवाल्यांनी राजकारण्यांना पैसे कुठून आणले विचारुन दाखवावं असं देखील या व्हिडिओमध्ये इंदुरीकर महाराज म्हणत आहे.

अजित पवारांना न सांगता बिहारमध्ये उमेदवार? प्रफुल पटेल म्हणाले, पक्षाचे संघटन…

नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यातील वसंत लॉन्स येथे मोठ्या थाटामाटात इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला 2000 पेक्षा जास्त लोक उपस्थितीत होते असं सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाल्यानंतर लोकांनी इंदुरीकर महाराजांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर मुलीच्या पेहरावावरून अनेकांनी इंदुरीकर महाराजांना ट्रोल केलं यानंतर इंदुरीकर महाराजांनी आपण कीर्तन सेवेतून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले होते.

follow us