राळेगणसिद्धीच्या ग्रामपंचायतीची चौकशी पूर्ण, पर्यटन विकासाच्या कामात अनियमिततेची तक्रार

सुनील हजारे यांनी यासंबंधी तक्रार केली आहे. ग्रामपंचायतीच्या 2022 ते 2026 या काळातील कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 30T170414.746

Inquiry into Ralegan Siddhi Gram Panchayat completed : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव सामाजिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी पर्यटन विभागातून 2 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. त्यात मोठी अनियमितता झाल्याची तक्रार अण्णांचे कार्यकर्ते सुनील हजारे यांनी केली आहे. त्यासाठी अण्णांसोबत घेत त्यांचा पाठपुराला सुरू आहे. तर दुसरीकडे राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीसंबंधीही तक्रार करण्यात आली असून जिल्हा परिषदेकडून चौकशी करण्यात आली आहे. याच्या अहवालाची आणि त्यानंतर होणाऱ्या कारवाईची आता प्रतीक्षा आहे.

गावातील रहिवाशी सुनील हजारे यांनी यासंबंधी तक्रार केली आहे. ग्रामपंचायतीच्या 2022 ते 2026 या काळातील कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यारी अधिकारी आनंद भंडारी यांनी चौकशी समिती नियुक्त केली. जलजीवन मिशनचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र देसले, विस्तार अधिकारी सुजित भोंग व चंद्रकात खाडे यांच्या समितीने गावात जाऊन पाहणी आणि चौकशीही केली आहे. त्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राष्ट्रीय पेयजल योजना, जलजीवन मिशन, रोजगार हमी योजना, जिल्हा परिषद शाळेची कामे, पद्रमावती मंगल कार्यालय परिसरातील कामे, 2515 या योजना कलमातील ग्रामनिधीतून झालेली कामे, 15 व्या वित्त आयोगातून झालेली कामे यात अनियमितता झाल्याचा आरोप सुनील हजारे यांनी केला आहे. त्यानुसार ही चौकशी झाली आहे. यात दोषी आढळणाऱ्यांना पाठीशी घालू नये, अशी मागणी अण्णा हजारे यांनीही अधिकाऱ्यांकडे केली आहे.

बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर अचानक बेपत्ता, चमोलीत क्रॅश झाल्याचा संशय, 5 प्रवाशांसह पायलटचा शोध सुरू!

ग्रामपंचायतीची मुदते गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात संपली आहे. सध्या तेथे प्रशासक आहेत. मात्र, चौकशीचा काळ 2022 पासूनच आहे. त्यामुळे मागली पदाधिकाऱ्यांच्या काळातीलही कामाची चौकशी करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यात बरीच अनियमितता समितीला आढळून आली आहे. त्यानुसार वरिष्ठांनी कारावाईच्या सूचनाही दिल्याचे सांगण्यात येते. चौकशी अहवाल आणि कारवाई अहवाल आल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

यासोबतच पर्यटन विकास विभागाच्या कामातही अनियमितता झाल्याचा सुनील हजारे यांचा दावा आहे. नियमानुसार मंजुरी न घेणे, नकाशाप्रमाणे कामे न करणे, एकच काम विविध योजनेतून झाल्याचे दाखविणे, असे प्रकार झाल्याची तक्रार सुनील हजारे यांनी घेतली आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी त्याची दखल घेत पत्र्यव्यहार केला आहे. यासोबतच अण्णा हजारे यांनीही मंत्री देसाई यांना पत्र पाठवून योग्य ती चौकशी आणि कारवाईची मागणी करीत आपली भूमिका मांडली आहे.

ग्रामपंचायतीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने ऑगस्ट महिन्यातच प्रत्यक्ष पाहणी आणि कागदपत्रांची तपासणी करून चौकशी केली आहे. त्याचा अहवालही तयार झाल्याचे सांगण्यात येते. एक दोन दिवसांत तो जाहीर होण्याची शक्यता आहे.

follow us