Solar Eclipse 2023 : 100 वर्षांनंतर आलेलं ‘हायब्रीड सुर्यग्रहण’ भारतात दिसणार?
Is in India Hybrid Solar Eclipse 2023 : सुर्यग्रहण म्हणजे पृथ्वी आणि सुर्यामध्ये ग्रह आल्याने पृथ्वीवर पडणारी सावली. हे आपण शाळेमध्ये शिकलो आहोत. मात्र तुम्ही कधी ‘हायब्रीड सुर्यग्रहण’ ही संकल्पना ऐकली आहे का? कारण यावर्षीं म्हणजे आजच्या अमावस्येला दिसणारं सुर्यग्रहण हे ‘हायब्रीड सुर्यग्रहण’ असणार आहे. हे ग्रहण 100 वर्षांनंतर पाहायला मिळणार आहे.
‘हायब्रीड सुर्यग्रहण’ म्हणजे काय?
‘हायब्रीड सुर्यग्रहण’ म्हणजे साधारणतः ग्रहणाचे तीन प्रकार असतात यामध्ये आंशिक, कंकणाकृती किंवा खग्रास. पण ‘हायब्रीड सुर्यग्रहण’ हे आंशिक, कंकणाकृती किंवा खग्रास या तिन्हीचे मिश्रण असते. यावेळी होत असं की, या सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राचे पृथ्वीपासूनचं अंतर जास्त किंवा कमी नसते. या दुर्मिळ ग्रहणादरम्यान, सूर्य काही सेकंदांसाठी रिंगसारखा आकार बनवतो, ज्याला रिंग ऑफ फायर म्हणतात.
उष्णतेची लाट…हवामान विभागाचा ‘या’ राज्यांना ‘हाय अलर्ट’
आज हे ग्रहण सकाळी 7.45 ते 12.29 पर्यंत दिसणार आहे. मात्र भारतीय खगोलप्रेमींना हे ग्रहण पाहण्याची संधी मिळणार नाही. कारण भारतात हे ग्रहण दिसणार नाही. तर अनेक लोक धार्मिक दृष्टीकोनातून ग्रहणाचे वेदादी नियम पाळतात त्यांना देखील हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नसणार आहे.
हे ग्रहण कंबोडिया, चीन, अमेरिका, मायक्रोनेशिया, मलेशिया, फिजी, जपान, सामोआ, सोलोमन, बेरुनी, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, व्हिएतनाम, तैवान, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, फिलीपिन्स या देशंमध्ये दिसणार आहे.