राज्यात आणखी थंडी वाढणार, कडाक्याच्या थंडीने दोघांचा मृत्यू

राज्यात आणखी थंडी वाढणार, कडाक्याच्या थंडीने दोघांचा मृत्यू

मुंबई : राज्यात थंड वारे वाहू लागल्याने नागपूरमध्ये अचानक पारा घसरला आहे. नागपूरमध्ये अचानक पारा घसरल्याने नागपूरात कडाक्याच्या थंडीमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी सुरू पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

देशात कालपासून अचानक थंडीचा कडाका वाढला आहे. देशात प्रामुख्याने उत्तर भारतात अचानक तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. याचा परिणाम नागपूर आणि परिसरात होत आहे.

नागपूर शहरात गेल्या दोन दिवसांत दोन अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. हे दोन्ही मृत्यू थंडीने झाल्याची शंका व्यक्त केले जात आहे. शहरातील मोरभवन जवळ 70 वर्षीय वृद्ध मृतावस्थेत आढळले आहेत तर गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत 35 ते 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान यांचा मृत्यू थंडीमुळे झाल्याचे बोलले जात आहे. हे दोन्ही जण कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पुढील तपासणीनंतर मृत्यूच्या कारणांचा खरा रिपोर्ट येणार असल्याचे बोलले जात आहे.

याचबरोबर गोंदिया आणि विदर्भात सलग तिसऱ्या दिवशी सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात झाली आहे. जिल्ह्याचे तापमान 11.8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. तापमानात सातत्याने घट होत असल्याने जिल्हा गारठल्याचे चित्र असून याचा दैनंदिन वेळापत्रकावर सुद्धा काहीसा परिणाम झाला आहे. तर लोकं शेकोटीसह गरम कपड्याचा आधार घेत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube