भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज संभाजीनगरमध्ये, जाहीर सभेचं आयोजन

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज संभाजीनगरमध्ये, जाहीर सभेचं आयोजन

संभाजीनगर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. नड्डा यांची संभाजीनगरमध्ये संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभा देखील होणार आहे. त्यांच्या या सभेसाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच सभेतून नड्डा हे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर नड्डा यांचा हा छत्रपती संभाजीनगर मधील पहिलाचं दौरा आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आतापासूनच तयारीला सुरू झाली आहे. यासाठी भाजपकडून स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी एकापाठोपाठ बैठका सुरु आहेत. याच लोकसभा निवडणुकीचं रणशिंग भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा येथील जाहीर सभेतून फुकणार असल्याची माहिती मिळतेय. त्यासाठी आज संभाजीनगरमध्ये नड्डा यांची जाहीर सभा होत आहे.

संभाजीनगरमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर संध्याकाळी पाच वाजता ही जाहीर सभा होणार आहे. यासाठी भाजपकडून जोरदार तयारी केली आहे. या सभेला किमान 25 हजार लोकांची गर्दी जमवण्याचा निश्चय भाजपकडून करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळं या सभेकडं सर्वांचंच लक्ष लागलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube