सुरतहून परतलो तेव्हा जाणीव होती की, हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात; शिरसाटांचा गौप्यस्फोट, कैलास पाटलांची प्रतिक्रिया

Kailas Patil on Sanjay Shirsat संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यावर आता आमदार कैलास पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

Sanjay Shirsat Kailas Patil

Kailas Patil on Sanjay Shirsat startling revelation about Eknath Shinde rebellion : एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत सत्तास्थापन केली. या घटनेला 4 हून अधिक वर्षे झाली. पण या ऐतिहासिक बंडाच्या वेळीच्या अनेक घटना, किस्से आणि थरार आजही अनेक गौप्यस्फोट म्हणून बाहेर येतात. त्यातच आता शिवसनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यावर आता आमदार कैलास पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले कैलास पाटील?

सुरतच्या बॉर्डरवरून परतलेला आमदार मीच आहे. परत येण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला जाणीव होती की, हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. मात्र चार वर्षांनंतर शिरसाट हे का उकरून काढतायेत? यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टीकरण द्यावं.

नेमकं काय म्हणाले होते संजय शिरसाट?

मंत्री संजय शिरसाटांनी एका पॉडकास्ट दरम्यान म्हटलं की, पक्ष फुटीवेळी एकनाथ शिंदे यांचा फोन आला त्यावेळी आम्ही ठाणे येथे गेलो. तेथून सुरत येथे जात असताना एक टोल नाका आला, तिथे 3 ते 4 किमी लांब वाहनाची रांग होती. गाड्या सुरतकडे जाऊ नये यासाठी वाहनाच्या रांगा होत्या, तेव्हा शिंदे यांनी तिथल्या पोलिस अधीक्षक यांना फोन केला व विचारले की टोल नाक्यावर काय होत आहे? तेव्हा त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री यांचे आदेश आहेत. शिंदे म्हणाले की माझा आदेश माहिती आहे ना? वाहतूक सुरळीत करा, तेव्हा ट्रॅफिक क्लिअर झाली आणि आम्ही गेलो.

मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा संशय, 55 जणांची तपासणी, 12 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह

ही एक वेबसिरीज सारखी घटना आहे. पाऊस पडत होता. एक आमदार परत जाण्यासाठी धडपडत होता, पुढचं काही सांगत नाही मात्र त्या दिवशी त्याचं राम नाम सत्य झाले असते. आम्ही थांबावलं म्हणुन त्यांना परत जाता आलं असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी एका पॉडकास्ट दरम्यान मुलाखती दरम्यान केला. आमदार कैलास पाटील हे सुरत येथून परत असल्याचे सर्वश्रुत असुन त्या अनुषंगाने शिरसाट यांनी गौप्यस्फोट केला.

follow us