Kolhapur Munciple Corporation : ४२ गावांच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर उदय सामंत काय म्हणाले?

Kolhapur Munciple Corporation : ४२ गावांच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर उदय सामंत काय म्हणाले?

मुंबई : कोल्हापूर शहराच्या लगतच्या ४२ गावांचा समावेश कोल्हापूर महानगरपालिकेत (Kolhapur Munciple Corporation) करून हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) विधानसभेत सांगितले. याबाबतची लक्षवेधी सूचना विधानसभा सदस्य जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांनी मांडली होती.

उद्योगमंत्री सामंत म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत ज्या महिन्यात संपत असेल त्याच्या सहा महिने अगोदरच्या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात आणि हद्दीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येत नाही असा नियम असल्याने याबाबत निवडणूक झाल्यानंतर या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

कोल्हापूर शहराची हद्दवाढ मागील चाळीस वर्षात झाली नाही. ती व्हावी म्हणून सुरुवातीला १८ गावांचा समाविष्ट करणारा प्रस्ताव महापालिकेने तयार करून राज्य सरकारला पाठवला. मात्र, कोल्हापूरच्या ग्रामीण भागातून हद्दवाढीला विरोध होत असल्याने आहे. हद्दवाढ रखडल्याचे चित्र आहे.

Pawar Vs Vikhe : फडणवीसांनी डाव टाकला अन् पवारांचा ‘काटा’ काढला!

कोल्हापूर नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर होतानाच हद्द वाढणे आवश्यक होते. पण तसे काहीच झाले नाही. नंतर हद्दवाढीचा पहिला प्रस्ताव १९८९ मध्ये तयार करून २४ जुलै १९९० ला हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला. या प्रस्तावात ४२ गावांच्या हद्दवाढीचा समावेश केला आहे. पुढे तीन वर्षांनंतर १९९२ मध्ये त्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली. त्यातील काही गावांनी हद्दवाढीला त्यावेळी विरोध केल्याने पुढे दहा वर्षे काहीच झाले नाही. हा विरोध पाहून त्यातील काही गावे वगळून हद्दवाढीचा नवीन प्रस्ताव पाठवावा, असे पत्र सरकारने २००१ मध्ये कोल्हापूर महापालिकेला सांगितले. परंतु गेल्या २० वर्षे नुसती चर्चाच सुरु आहे. पण पुढे काहीच होत नाही. आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांचे याकडे लक्ष लागले आहे.

यापूर्वी कोल्हापूर महापालिकेने राज्य सरकारकडे २००१ आणि २०११ च्या जनगणनेनुसार हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यात शहरालगतच्या कळंबा, गांधीनगर, उजळाईवाडी, उचगाव, पाचगाव, मोरेवाडी, गोकुळ शिरगाव, तामगाव या आठ गावांची नोंद जनगणना नगर (सेन्सेक्‍स टाउन) करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील लोकसंख्येची घनता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या गावांचा विचार हद्दवाढीत करण्यात यावा, असे कोल्हापूर महापालिकेने पाठवलेल्या अहवालात म्हटले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube