रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचं काम अॅक्शनमोडमध्ये; संभाजीनगर-परभणी मार्ग जमीन मोजणी
जमीन मोजणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहिम 20 मेपर्यंत चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठवाड्यातील रेल्वे यंत्रणेला आणखी (Railway) गती येणार असून, छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वे रुळांचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. या मार्गावरील सध्याचा रेल्वेमार्ग अपुरा असून याच्या दुहेरीकरण करण्याचे नियोजन आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीला आणखी बळ मिळणार आहे. या दुहेरीकरण कामासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील विविध गावांमध्ये जमीन मोजणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहिम 20 मेपर्यंत चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठवाड्यात पाणीटंचाईचं मोठं संकट; 63 गावांची तहान भागवण्यासाठी 106 टँकर
या गावांमध्ये होणार भूसंपादन
संबंधित गावांतील गट क्रमांकांची मोजणी निश्चित तारखेनुसार करण्यात येणार आहे. यामध्ये गादेजळगाव, सातारा, कुंभेफळ, वरुड काझी, फतेपूर, करंजगाव, मुस्तफाबाद, करमाड, शैदा जहांगीर, सातारा, लाडगाव, मुकुंदवाडी, चिकलठाणा दक्षिण, चिकलठाणा, मुर्तुजापूर, हसनाबादवाडी, देमणी, शेकटा, शहानूरवाडी, गारखेडा आदी गावांचा समावेश आहे.
गारखेडा येथून मोजणीला सुरुवात
संबंधित गावांतील गट क्रमांकांची मोजणी निश्चित तारखेनुसार करण्यात येणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मोजणी मोहीम ३० एप्रिल रोजी गारखेडा येथून सुरू झाली असून 20 मे रोजी शाहूनगरवाडी व गारखेडा येथील कामकाजाने पूर्ण होणार आहे. विविध गावांसाठी 5, 6, 8, 11, 13, 14, 15 आणि २० मे अशा तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित जमिनीचे मालक, धारक व नागरिकांनी मोजणीच्या दिवशी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मोजणी प्रक्रियेदरम्यान सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने राबविण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची मानली जात असून, यामुळे पुढील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.