नगर तालुक्यात तनपुरेंच्या गावभेटी अन् प्रचार; गावखेड्यांना पोहोचविणार पाणी..
Prajakta Tanpure : राहुरी मतदारसंघात प्रचार वेगात सुरू झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी गावभेटी आणि संवाद दौऱ्यांवर भर दिला आहे. राहुरी मतदारसंघात नगर तालुक्यातील काही गावे येतात. तेव्हा आ. तनपुरे यांनी या गावांत प्रचार फेरी काढली. नागरिकांशी संवाद साधला. तालुक्यातील दरेवाडी, सैनिक नगर, बाराबाभळी, आलमगीर, वारूळवाडी, कापूरवाडी, गजराज नगर, बुऱ्हाणनगर, वडारवाडी नागरदेवळे येथे प्रचार दौरा केला.
महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगरमध्येही प्रचार केला. यावेळी अभिषेक भगत, अमोल जाधव, गोविंद मोकाटे, रामेश्वर निमसे, झोडगे, राहुल ढोरे, उद्धव दुसिंगे, विलास काळे, रामदास ससे, अजय गुंड, कुणाल भगत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिवाजी कर्डिले यांच्यावर टीकाही केली.
Rahuri Vidhansabha : माजी आमदारांनी दहा वर्षांतील कामे सांगावीत?, तनपुरेंनी थेट विचारलं
जलजीवन मिशनच्या माध्यमातून मुळा धरणातून बुऱ्हाणनगर पाणी योजनेत आपण काही बदल केले आहेत. योजनेतील घाटाखालील राहुरी व नगर तालुक्यातील खडांबे, धामोरी, देहरे, विळद गावांसाठी वेगळी योजना केली आहे. घाटावरील ग्रामीण भागातील गावांसाठी स्वतंत्र जलवाहिनी व बुर्हाणनगर, नागरदेवळे साठी स्वतंत्र जलवाहिनी केली आहे. भविष्यात बुऱ्हाणनगर पाणी पुरवठा योजनेतील सर्व गावांना योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी कटिबद्ध आहे.
आमदार म्हणून पाच वर्षे काम करताना मतदार संघातील सर्व गावांना मूलभूत सोई-सुविधा कशा मिळतील. यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. या भागातही अनेक ठिकाणी रोहित्र दिले. पाच वर्षात फक्त विकास कामांवर फोकस केला. कोणत्याही विरोधकाला कोणत्याही प्रकारे त्रास देण्याचा कधीही विचार केला नाही, असे तनपुरे यावेळी म्हणाले.
राहुरी व पाथर्डी तालुक्यासह अहिल्यानगर तालुक्यातही तुतारी चिन्ह जोमात आहे. कितीही आवाज दाबला तरी तुतारी वाजणारच आहे. आपला विजय निश्चित आहे. राज्यातही महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा विश्वास आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.
गुहात कर्डिलेंना धक्का…भाजपला रामराम करत कार्यकर्ते तनपुरेंच्या पाठीशी