‘बारसू’ प्रकल्पात फडणवीसांना वेगळाच संशय; म्हणाले, काहीतरी घडावे यासाठी त्यांचा..

‘बारसू’ प्रकल्पात फडणवीसांना वेगळाच संशय; म्हणाले, काहीतरी घडावे यासाठी त्यांचा..

Devendra Fadnavis on Barsu Refinery Project : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीला (Barsu Refinery) विरोध वाढत चालला आहे. काल महाविकास आघाडीच्या सभेत या प्रकल्पावरून सरकारला धारेवर धरण्यात आले. आंदोललकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी या सभेत केला. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘बाहेरून लोक आणून आंदोलन करण्याचे काम चालू आहे. कारण, स्थानिक लोक मुळातच कमी आहेत. रिफायनरीला समर्थन देणारेही तेथे आहेत. मात्र, सरकारची बदनामी होईल असा काहीतरी प्रकार तेथे घडला पाहिजे असा काही लोकांचा प्रयत्न आहे. पण यांनी काही केले तरी जनतेच्या लक्षात आले आहे की हे लोक दुटप्पी आहेत. एकीकडे हेच लोक पत्र पाठवतात रिफायनरी करा मग तेच आंदोलनाला जातात. म्हणजे यांचा खरा चेहरा आता समोर लोकांसमोर आला आहे’, अशी टीका फडणवीस यांनी केली.

Sharad Pawar : आज‘लोक माझे सांगाती’चा पार्ट 2 येणार; काय नवे खुलासे समोर येणार? उत्सुकता शिगेला

ते पुढे म्हणाले, माझं मनोरंजन होत आहे. जे लोक आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणण्याऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणायला लागले आहेत त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवावं हे देखील एक आश्चर्यच आहे, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.

मोदींवर लोकांचे प्रेम 

हे लोक जितके मोदींना शिव्या देतील तितके लोक यांना पराजित करणार आहेत. लोक मोदींना प्रेम करतात. यांनी जितक्या मोदींना शिव्या दिल्या तितके लोकांनी यांना पराभूत केले आहे. दहा वर्षे ज्या पक्षाला विरोधी पक्षनेताही करता आला नाही तो पक्ष मोदींना शिव्या देऊन आणखी रसातळाला जात आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube