अजितदादांचे ‘त्या’ दाव्यावर मौन; म्हणाले, मी आणि संजय राऊत..
Ajit Pawar : आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. या सभेआधीच जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार पंधरा दिवसांत कोसळणार असल्याचा दावाही केला होता. राऊत यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला होता.
‘विखे पाटलांनी फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावं’ ; राऊतांचा खोचक टोला
काय म्हणाले राऊत ?
सध्या जो तो आपापल्या पद्धतीने गणित मांडत आहे. आम्ही मात्र निर्णयाची वाट पाहत आहोत. पण, येत्या 15 ते 20 दिवसात हे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही. याआधीही मी एकदा म्हणालो होतो की हे सरकार फेब्रुवारीपर्यंत कोसळेल. पण, न्यायालयाचा निकाल उशीरा लागत आहे. पण हे सरकार टिकणार नाही. सरकारचे डेथ वॉरंट निघाले आहे. आता सही कोणी आणि कधी करायचे हे देखील ठरल्याचे राऊत म्हणाले होते.
राऊत यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, मला या मुद्द्यावर काहीही बोलायचं नाही. संजय राऊत आणि माझी नागरपूरमधून एकत्र येत असताना भेट झाली होती. त्यानंतर मात्र फोन किंवा समक्ष चर्चा झालेली नाही. त्यांनी कोणत्या आधारावर हे वक्तव्य केले माहित नाही. अनेकजण अशी वक्तव्यं करतात. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माझ्याकडे काही माहिती नसल्याने मी काय बोलू ? असे पवार म्हणाले.
राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण ? मंत्री दानवे म्हणाले, मी बोललेला शब्द खराच ठरतो !
सभेआधी राजकारण जोरात
उद्धव ठाकरे यांची आज जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा होणार आहे. सभेआधीच राजकारणाचा पारा चढला आहे. मंत्री गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्यात जोरात शाब्दिक युद्ध सुरू आहे. शिंदे गटाने सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे तर संजय राऊत यांनी सरकार लवकरच कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. सभेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.