फडणवीसांचा राष्ट्रवादीला खोचक टोला; म्हणाले, साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष कर्नाटकात काय डोंबलं..

फडणवीसांचा राष्ट्रवादीला खोचक टोला; म्हणाले, साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष कर्नाटकात काय डोंबलं..

Devendra Fadnavis Criticized NCP : कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा (Karnataka Elections) प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचाराचा धुराळा उडाला आहे. या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकारणही चांगलेच पेटले आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटकात प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) आपले 9 उमेदवार उतरवले आहेत. देवेंद्र फडणवीस भाजपाच्या (BJP) उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. आज त्यांनी निपाणी येथे प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला.

पूर्वी अकलूजला धमक होती पण आता…रोहित पवारांनी मोहिते पाटलांना डिवचलं

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा एक पक्ष आहे. या पक्षाने आता इथे अख्ख्या कर्नाटकमध्ये त्यांचा एक उमेदवार दिला आहे. तो उमेदवार निपाणीत आहे. हा पक्ष काय डोंबलं करणार आहे इथे येऊन ? खरं म्हणजे ही यांची मिली जुली कु्स्ती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही मिली जुली कुस्ती सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येथून पॅक करून पाठवून द्या, आम्ही पाहून घेऊ, असे फडणवीस म्हणाले.

काँग्रेस जिंकणार : पवार

कर्नाटक निवडणुकीबाबत काही दिवसांपूर्वी  शरद पवार यांनी मोठं भाकित केले होते. ते म्हणाले होते, राज्यातील परिस्थिती मला माहिती आहे. मी अनेक सहकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यानुसार या निवडणुकीत भाजपाचा पराभव होण्याची शक्यता आहे. काँग्रेस सत्तेवर येईल, असे तेथील चित्र आहे. कर्नाटकातील लोकांना आता बदल हवा आहे आणि हा बदल भाजपाचे उमेदवार घरी बसवून लोकांना हवा आहे, असे पवार म्हणाले होते.

दरम्यान, कर्नाटकात सध्या काँग्रेसला चांगले वातावरण असल्याचे दिसून येत आहे. अनेक निवडणूकपूर्व अंदाजात काँग्रेस यंदा चांगले प्रदर्शन करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  काँग्रेसने तिकीटवाटपातही चांगले नियोजन केले होते. यंदा भाजपाच्या आधी उमेदवारी वाटप, उमेदवारांची यादी जाहीर केली होती. प्रचारही जोरदार केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube